मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारतातील प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनल रिटेल चेन विजय सेल्सने आयआयसीएफ कन्झ्युमर एक्स्पोशी सहयोग करून मुंबईतील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स एक्झिबिशन बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात आयोजित केले आहे. तब्बल ६०,००० चौ. फुट क्षेत्रफळात पसरलेल्या या इलेक्ट्रॉनिक शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये टेक चाहत्यांना तसेच कुटुंबांना आकर्षित करण्यासाठी १०० उत्कृष्ट ब्रॅंड गुणवत्तेची हमी देत सामील झाले आहेत. टेक्नॉलॉजीच्या चाहत्यांपासून ते आपल्या घरासाठी अधिक अपग्रेडेड उपकरणे विकत घेऊ पाहणाऱ्या सर्वांसाठी हा एक्स्पो उपयुक्त आहे. हे एक्झिबिशन ६ जानेवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे.
या प्रदर्शनात अॅपल, सॅमसंग, एलजी, सोनी, वनप्लस, बोट, हेयर, व्हर्लपूल, अॅसस, हिताची, गोदरेज, आयएफबी, मॉरफी रिचर्ड्स, फिलिप्स, वंडरशेफ, एओ स्मिथ आणि इतर अनेक आघाडीच्या ब्रॅंड्स कडून नवीन उत्पादनांचे लॉन्चिंग, प्रात्यक्षिके आणि जबरदस्त सौदे ऑफर करण्यात येतील.
अगदी अलीकडे लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्सपासून ते स्मार्ट किचन उपकरणे आणि प्रीमियम होम अॅप्लायन्सेसपर्यंत, सगळ्यांना आकर्षित करणारे असे काहीतरी आहेच. येथे प्रत्येक मोठ्या ब्रॅंडचा एक स्वतःचा एक्सपिरीयन्स झोन आहे. उत्पादने प्रत्यक्ष बघून उत्तम सौदा करण्यासाठी खरेदीदारांना मिळालेली ही उत्तम संधी आहे.
विजय सेल्सचे डायरेक्टर श्री. निलेश गुप्ता म्हणाले, “वर्षाची अखेर होताना विजय सेल्स मुंबईचे सर्वात मोठे प्रदर्शन प्रस्तुत करत आहे. इंडिया इंटरनॅशनल कन्झ्युमर फेअरशी भागीदारी करून आम्ही ग्राहकांना अतुलनीय किंमतीत अत्याधुनिक टेक्नॉलॉजी-उत्पादने प्रत्यक्ष बघून, उत्तम सौदा करून ती विकत घेण्याची संधी प्रदान करत आहोत. या उत्पादनांवर आकर्षक सवलती आहेत त्यामुळे स्वतःसाठी किंवा प्रियजनांसाठी खरेदी करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. या अनोख्या प्रदर्शनात येण्यासाठी आणि एकापेक्षा एक सरस ब्रॅंड्सची उत्पादने पाहून, खरेदी करून या सणासुदीच्या मोसमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.”
विजय सेल्ससोबत शॉपिंग करण्यात आणखी एक फायदा आहे, तो म्हणजे मायविएस लॉयल्टी प्रोग्राम, जो त्यांच्या दुकानातून किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ०.७५% लॉयल्टी पॉइंट देतो. प्रत्येक पॉइंटची किंमत १ रुपया इतकी असून दुकानातून खरेदी करताना हे पॉइंट वापरता येतात.
मोठ्या बँकांकडून मिळणारी इन्स्टंट डिस्काउंट
एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारक २०,००० रु. च्या वरील क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ४५०० रु. पर्यंत ७.५% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. यस बँकेचे ग्राहक १०,००० रु. च्या वरील क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर २५०० रु. पर्यंत ५% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात, आरबीएल बँक क्रेडिट कार्ड धारक १५,००० रु. वरील ईएमआय व्यवहारांवर ४५०० रु. पर्यंत १०% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात, बँक ऑफ बरोडाचे ग्राहक १५,००० रु. वरील बॉबकार्ड ईएमआय व्यवहारांवर १५०० रु. पर्यंत ७.५% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड धारक २५,००० ते ४९,९९९ रु. च्या खरेदीपर्यंत ईएमआय व्यवहारांवर फ्लॅट ७.५% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात, तर ५०,००० रु. आणि त्यापेक्षा जास्त खरेदीसाठीच्या ईएमआय व्यवहारांवर १५,००० रु. पर्यंत १०% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. एयू स्मॉल फायनॅन्स बँक क्रेडिट कार्ड धारक फक्त रविवारच्या दिवशी १०,००० रु. वरील नॉन-ईएमआय व्यवहारांवर १००० रु. पर्यंत ५% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. डीबीएस बँक क्रेडिट कार्ड धारक त्यांच्या ईएमआय व्यवहारांवर ३००० रु पर्यंत आणि १५,००० रु. च्या वरील नॉन-ईएमआय व्यवहारांवर १५०० रु. पर्यंत १०% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड धारक ५०,००० रु. आणि त्यावरील ईएमआय व्यवहारांवर १०,००० रु. पर्यंत ५% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. पीएनबी बँक क्रेडिट कार्ड धारक १५,००० रु. आणि त्यावरील ईएमआय व्यवहारांवर ५००० रु. पर्यंत १०% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. फेडरल बँक क्रेडिट कार्ड धारक २०,००० रु. आणि त्यावरील ईएमआय व्यवाहरांवर ३५०० रु. पर्यंत आणि नॉन-ईएमआय व्यवहारांवर ३००० रु. पर्यंत १०% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात, तर डेबिट कार्ड धारक २०,००० रु. आणि त्यावरील नॉन-ईएमआय व्यवहारांवर २५०० रु. पर्यंत १०% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात.