इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावल्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील सागर बंगल्यावर जाऊन ही भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधान आले आहे.
या भेटीनंतर छगन भुजबळांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी आणि समीर भुजबळ यांनी भेट घेतली. ४० मिनटं चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी माझं सर्व एेकून घेतलं. यामध्ये मला ८ ते १० दिवसांचा वेळ द्या. आपण ८-१० दिवसांत शांततेने मार्ग काढू, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. या भेटीत राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
या बैठकी बाबत भुजबळ म्हणाले की, निवडणुकीत आपल्याला महाविजय जो मिळाला आहे. त्यात ओबीसीचे पाठबळ जे लाभलं त्याबद्दल आभार मानले. तसेच ओबीसीचे नुकसान होणार नाही. याची मला देखील खूप काळजी आहे. असं देवेंद्र फडणीस बैठकीत म्हणाल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.