नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना लवकरात लवकर मुंबईत पोहोचता यावे तसचे दिवसभरातील कामे आटोपुन झाल्यावर सदर प्रवाशांना लवकरात लवकर विना ट्रफिक मुंबईतुन बाहेर पडता यावे यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. याकामी मुलूंड ते वडपे या दरम्यान सध्या आठ मार्गीकांचे काम सुरू असुन यादरम्यानच्या पंचवीस किलोमीटर अंतरावर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निर्मिती करण्यात यावी अशी आग्रही मागणी आज खासदार हेमंत गोडसे यांनी रस्ते व वाहतुक महामार्ग विभागाचे मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. मुलूंड ते वडपे यादरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉरची निर्मिती करण्याची आपली मागणी योग्य असून उत्त्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही ना. गडकरी यांनी खा. हेमंत गोडसे यांना दिली आहे.
एनएच 3 या नॅशनल महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असल्याने नाशिक ते मुंबई यादरम्यानच्या प्रवासास सहा ते साडे सहा तास लागतात. महामार्गावर आधीच खड्डे त्यात वडपे शिवारात आय आर पी कडुन अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने महामर्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. भविष्यात समृद्धी महामार्गावरून येणारी वाहने वडपे शिवारातुन मुलूंडकडे जाणार असल्याने मुलूंड ते वडपे यादरम्यान वाहतुकीची भयंकर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मुलूंड ते वडपे दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉरची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडुन खा. गोडसे यांच्याकडे होत आहे.
प्रवाशांची मागणी न्यायिक असल्याने आज खा. गोडसे यांनी दिल्लीत रस्ते व वाहतुक मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेतली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर या जिल्ह्यामंधील हजारो वाहने रोज मुंबई मंत्रालयात येतात. दिवरभराची कामे आटोपल्यानंतर सदर वाहने रात्री पुन्हा गावाकडे परतीच्या प्रवासासाठी निघतात. परंतु मुलूंड ते वडपे यादरम्यान तासंतास वाहतुकीची कोंडी होत असल्याने चालक आणि प्रवाशांची मोठी कुचंबना होत असते. यामुळे प्रवासाचा वेग मंदावत असल्याने प्रवासास मोठा विलंब होतो त्यामुळे उत्त्तर महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये नाराजीचा सुर असून त्यांच्या मनात असंतोषाचे वातावरण आहे.
उत्त्तर महाराष्ट्रातील प्रवाशंना दिलासा देण्यासाठी मुलूंड ते वडपे या सुमारे पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निर्मिती करण्यात यावी अशी आग्रही मागणी खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी खा. हरिश्चंद्र चव्हाण, संजय सोनवणे, बजुनाना शिरसाठ, रामदास खुळे, संजय गोडसे, सुनिल सोनवणे, काशीनाथ सानप, संतोष गोडसे, आकाश गोडसे, करमचंद्र धुरिया, आकाश साळवे व आदि मान्यवर उपस्थित होते.
Mumbai Nashik Highway Traffic Mulund Vadpe New Proposal