शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमधून जाणार मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे; लवकरच दुसरी बैठक

नाशिक जिल्ह्याला अधिकचा फायदा होईल असे सूक्ष्म नियोजन करावे - पालकमंत्री छगन भुजबळ

by India Darpan
ऑगस्ट 7, 2021 | 5:06 pm
in स्थानिक बातम्या
0
highspeed rail

नाशिक – समृद्धी महामार्गाला लागूनच मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पाला नाशिक जिल्ह्याचे संपूर्ण सहकार्य आहे. तसेच या प्रकल्पाचा मार्ग सिन्नर व इगतपुरी तालुक्यातून जाणार असल्याने जिल्ह्याला या प्रकल्पाचा अधिकाधिक फायदा होण्यासाठी त्याचा सूक्ष्म आराखडा सादर करण्याच्या सूचना, राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत .

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर भूसंपादनाची’ प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲ माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्हा नेहमी विकासाला प्राधान्य देणारा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा नाशिकला फायदा कसा होईल यासाठी नियोजन करण्यात यावे. इगतपुरी व सिन्नर या तालुक्यामधून हा प्रकल्प जात असल्याने यामध्ये समृध्दी महामार्गाव्यतिरिक्त कोणत्या गावातील जमीन भूसंपादन करणे आवश्यक आहे, याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी व संबधित तालुक्यांचे लोकप्रतिनिधी समवेत बैठक घेण्याबाबतची सूचना, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी संबंधितांना दिली आहे.

मुंबई-नागपूर हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिक जिल्ह्यातील कोणकोणत्या मार्गावर जाणार याचे सूक्ष्म नियोजन नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे प्रतिनिधींनी सादर करावे. तसेच जमीनी भूसंपादन करतांना अडचणी निर्माण होवू नये यासाठी पर्यायांची उपलब्धी सादर करावी, अशा सूचना यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबधितांना केली आहे.

मुंबई-नागपूर हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर बुलेट ट्रेन प्रकल्पातील तांत्रिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे प्रतिनिधी समवेत बैठक घेण्यात येईल. तसेच जमीनीचे भूसंपादन करतांना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

BSc नर्सिंग प्रवेशासाठी आता द्यावी लागणार ही परीक्षा; अधिसूचना जारी

Next Post

नाशकात अवघे इतके टक्केच लसीकरण; गती वाढविण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Next Post
IMG 20210807 WA0016

नाशकात अवघे इतके टक्केच लसीकरण; गती वाढविण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011