मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्याने तसेच तेथे मंत्रालय, विधिमंडळ म्हणजेच विधानसभा, विधान परिषद यांची मुख्यालय असल्याने याशिवाय इतर महत्त्वाची शासकीय कार्यालये असल्याने राज्यभरातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांचा नेहमीच मुंबईत रहिवास असतो. विशेषता अधिवेशन काळात तर मुंबईतच थांबावे लागते, साहजिकच आमदारांच्या राहण्यासाठी ४ ठिकाणी आमदार निवास उभारण्यात आली आहे, या पैकी दोन ठिकाणी काम सुरू आहे. सहाजिकच त्यांना राहण्यासाठी जागा नसल्याने सरकारकडून भाड्यापोटी दर महिन्याला त्यांना सुमारे १ लाख रुपये मिळतात, त्यामुळे दरवर्षी सरकारवर १५ कोटी रुपयांचा हार्दिक हार्दिक बोजा पडत आहे त्यामुळे आमदार निवासाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आता होत आहे.
विशेष म्हणजे नव्या मनोरा आमदार निवास कामाचे २०१९ मध्ये जुलै महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन झाले होते. मात्र या नव्या मनोरा आमदार निवसाचे काम अद्याप सुरु झालेले नाही. याच्या प्रत्यक्ष काम पूर्ण होण्याला आणखी पुढील वर्ष उजाडणार आहे. तीन वर्षांपासून आमदार निवासाचे काम रखडले आहे. त्यामुळे विधीमंडळावर कोट्यावधीचा आर्थिक बोजा पडत आहे.
कोरोना काळापासून आमदार निवासाचे काम रखडल्यामुळे आमदारांना राहण्यासाठी घरे अपलब्ध होत नाहीत, त्यामुळे आमदारांना भाड्यापोटी दर महिन्याला १ लाख रुपये द्यावे लागत आहेत. हादुसरीकडे भाड्यात आणखी वाढ करण्याची मागणी आमदारांच्या वतीने करण्यात येत आहे. मनोरा येथे निवासस्थान असलेल्या मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आमदारांना १ लाख रुपये दिले जात आहे. त्यांना सध्या सदनिका दिलेली नाही. सदर आमदार दक्षिण मुंबई किंवा अन्यत्र कुठेही सदनिका भाड्याने घेऊन राहत आहेत.
खरे म्हणजे महाराष्ट्रमधील आमदारांना मुंबईत राहण्याची हक्काची शासकीय सोय म्हणजे आमदार निवास होय. परंतु आमदारां पेक्षाही महाराष्ट्रामधील ग्रामीण भागाच्या कार्यकर्ते आणि सामान्य जनतेच बिनपैशाचे पण हक्काचे जणू घरच म्हणजे आमदार निवास आहे. मुंबईमध्ये २८८आमदारांना ४ ठिकाणी आमदार निवास बांधण्यात आले होते. त्यात मनोरा, मॅजेस्टिक, विस्तारित आणि आकाशवाणी असे ४ ठिकाणी चार आमदार निवासाची सोय करण्यात आली होती.
यातील मनोरा आमदार निवास पाडण्यात आले असून मॅजेस्टिक आमदार निवास जीर्ण झाल्यामुळे बंद आहे. कुलाबा येथील मॅजेस्टिक आमदार निवास या इमारतीचे बांधकाम १९०९मध्ये करण्यात आले होते. सध्या अनेक आमदारांना उर्वरित दोन आमदार निवासामध्ये सोय करण्यात आली आहे. तर बाकीचे भाडयाच्या बंगले, फ्लॅट किंवा घरात राहत आहेत. परंतु आमदारापेक्षाही ग्रामीण भागातील जनतेसाठी आमदार निवास हा जिव्हाळ्याचा विषय आहे. मंत्रालयात काम असेल तर मुक्काम पोस्ट आमदार निवास, मुंबईत आजारपणासाठी आल्यावर मुक्काम असेल, भरती नोकरी परीक्षा असेल तर आमदार निवास मुक्काम, आंदोलन मोर्चा, अधिवेशन म्हटलं की, हक्कच थांबण्याचे ठिकाण आमदार निवास मानले जाते.
Mumbai MLA Residence House Rent