मुंबई – मुंबई मेट्रो कार्पोरेशन लिमिटेडमध्ये टेक्नीकल ग्रेड – २ या पदावर निवड झालेल्या २८७ उमेदवारांपैकी काही उमेदवारांना सप्टेंबर ते डिसेंबर २० या कालावधीत ट्रेंनिग व नियुक्त्या दिल्या गेल्या. त्यानंतर मात्र ५ ते ६ महिने उलटून देखील उर्वरीत उमेदवारांना अजून पर्यत मेडिकल व नियुक्त्या झालेल्या नाहीत. यात जास्त महिला व माजी सैनिक उमेदवारांचा समावेश आहे त्यामुळे या उमेदवारांची अक्षरशः आर्थिक कुचंबणा होत आहे. रोजगारासाठी कुटूंबाची ही परवड झाली आहे.
सप्टेंबर २०१९ मध्ये विविध तांत्रिक पदांकरिता १ हजार ५३ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या सर्व पदांची ऑनलाईन परीक्षा ही नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल डिसेंबर महिन्यात लागला. निकाल लागल्यानंतर मुंबई मेट्रोने कागदपत्रे पडताळणीचे काम जानेवारी – फेब्रुवारी २०२० मध्ये हाती घेतले. काही महिन्यात अंतिम यादी जाहीर करण्यात आली. आणि यात बऱ्याच ट्रेंडच्या उमेदवारांना ट्रेंनिग व नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली होती केवळ tech- २ च्या काही उमेदवार यात सामील होते.
मात्र टेक्नीशियन ग्रेड २ च्या काही उमेदवारांना नोकरीबाबत अद्यापही ट्रेनिंगची वा जॉइनिंगची तारीख प्राप्त झालेली नाही. विशेष म्हणजे या सर्व उमेदवारांचे अद्याप मेडीकल सुध्दा झालेले नाही. यातील बरेच पदे महिला व माजी सैनिक प्रवर्गातील देखील आहेत.
देशासाठी प्राणपणाने लढलेल्या या उमेदवारांची मेट्रो कडून परवड झाली आहे.त्यामुळे सदर उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. २२ मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाला. तेव्हापासून उर्वरती टेक्निशियन ग्रेड -२ च्या उमेदवारांना ट्रेनिंगची या जाईनिंगची तारीख मिळालेली नाही. निकाल लागल्यापासून १६ ते १८ महिने झाले तरी मुंबई मेट्रोकडून जॉईनिंगच्या तारखेबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही.आणि सदर डिपार्टमेंट ला बऱ्याच वेळा विचारुन देखील समाधान कारक उत्तर मिळाले नाही
मे २०२१ पर्यंत नियुक्त्या घ्याव्यात!
आता निवड झालेल्या टेक्निशियन ग्रेड -२ च्या उमेदवारांपैकी ६० ते ७० टक्के मुलामुलींनी त्यांची मागची नोकरी सोडली आहे. त्यामुळे त्यांचा आर्थिक आवक बंद आहे. आम्हा सर्व टेक्निशियन ग्रेड – २ च्या उमेदवारांना मे २०२० पर्यंत जॉइनिंग द्याव्यात, अशी मागणी सदर उमेदवारांनी केली आहे.