मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई मेट्रोच्या 2- अ या दहिसर ते डहाणूकरवाडी मार्गावरील आणि मेट्रो ७ दहिसर ते आरे या दोन मार्गिकांवरील सेवा मुंबईकरांच्या सेवेत आज, दि. 2 एप्रिल रोजी, गुढीपाडव्यापासून रुजू होत आहेत. या दोन्ही मार्गिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार राहणार आहेत.
मुंबईतील आरे रोड, गोरेगाव पूर्व येथील संत पायस एक्स कॉलेज ग्राउंडवर आज, दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित या लोकार्पण कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, विधानरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खा. सुब्रम्हण्यम स्वामी, खा. अनिल देसाई, खा. संजय राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
ट्रॅफिकची चिंता दूर झाली,
मुंबईकरांनो.., #आपलीमेट्रो आली…गुढीपाडव्याला मुंबईतील मेट्रो लाईन २A आणि ७ या दोन मार्गिकांचे लोकार्पण होत आहे.#आपलीमेट्रो#Metro#MumbaiMetro2022 pic.twitter.com/UiODgBz6qS
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 1, 2022
दहिसर ते डहाणूकरवाडी या मेट्रो २अ मार्गावर ९ स्थानके असून यामध्ये दहिसर पूर्व,आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एक्सर, बोरिवली पश्चिम,पहाडी एक्सर, कांदिवली पश्चिम, डहाणूकर वाडी स्थानकांचा समावेश आहे. दहिसर ते आरे या मेट्रो ७ मार्गावर १० स्थानके आहेत. आरे,दिंडोशी,कुरार, आकुर्ली,पोयसर,मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान,ओवरी पाडा, दहिसर पूर्व या स्थानकाचा त्यात समावेश आहे.सुरुवातीच्या काळात सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत दोन्ही मेट्रो मार्ग सुरू राहणार असून एका मेट्रो ट्रेनला सहा कोच असतील. एका मेट्रोमधून २२८० प्रवासी प्रवास करु शकतात.
नवनिर्माणाच्या कार्याचे, बिकटवाट ही त्यात वसे,
सामर्थ्याच्या जोरावर, नव क्षीतिजावर जाऊ,
प्रगतीच्या या चाकावरती उंच भरारी घेऊ….गुढीपाडव्याला मुंबईतील मेट्रो लाईन २A आणि ७ या दोन मार्गिकांचे लोकार्पण होत आहे.#आपलीमेट्रो#Metro#MumbaiMetro2022 pic.twitter.com/rq4DrQ3znC
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 1, 2022