मुबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडिया आघाडीच्या बैठकीत मुंबईत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांना राखी बांधली. यावेळी त्यांनी कुटुंबियांबरोब काही वेळ गप्पा देखील मारल्या. मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी त्या मुंबईत आल्या आहेत.
या भेटीनंतर ममता बँनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मी आज अमिताभ बच्चन यांना राखी बांधली. बच्चन कुटुंबिय हे खूप चांगले आहेत. अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवायला हवे. केंद्र सरकार अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्कार देणार नाहीत तर आम्ही जनतेकडून हा पुरस्कार देऊ.. अमिताभ बच्चन यांचा आम्ही आदर करतो. त्यांच्या कुटुंबाचा खूप योगदान असेही त्यांनी सागितले. यावेळी त्यांनी आमच्या इथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो. या महोत्सवला शाहरुख खान, सलमान खान, महेश भट, अनिल कपूर येतात. आम्ही अमिताभ बच्चन यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण दिले असेही त्यांनी यावेळी सांगितले.