मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मॉलमधील किंवा गेम झोन मध्ये जम्पिंग गेम खेळण्याला लहान मुले आणि तरुण प्राधान्य देतात. शॉपिंग मॉलमधील गेम झोनमध्ये जम्पिंग गेम खेळणाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अपघात होऊ शकतो. मुंबईतील एका मॉलमधील गेम झोनमध्ये बाऊन्स गेम खेळल्यामुळे एका तरुणाचा थेट पाय मोडला.
बाऊन्स ट्रॅम्पोलिनची स्प्रिंग तुटला
तीर्थ कांजी बेरा (वय १९) नावाचा विद्यार्थी आपल्या मित्रांसह मुंबई शहरातील मालाड येथील इन्फिनिटी मॉलमध्ये गेम झोनमध्ये खेळण्यासाठी गेला होता. गेम झोनमध्ये जाण्यापूर्वी त्याने तिकीट काढले आणि बाउन्स गेमसाठी उडी मारली. तेव्हा बाऊन्स ट्रॅम्पोलिनचा स्प्रिंग तुटला आणि तो तरुण पडला. त्याला अपघात झाल्याचे पाहून तेथे मॉलमध्ये आलेले नाहीत जमा झाले त्यांनी तात्काळ त्याला उठण्यासाठी मदत केली. परंतु या तरुणाच्या उजव्या पायात तीव्र वेदना होऊ लागल्याने त्याला कुर्ल्यातील क्रिटीकेअर एशिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली असलेल्या हाडात फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले.
व्यवस्थापकावर गुन्हा दाखल, संशयिताला अटक
तीर्थ कांजी बेरा हा कॉलेज मध्ये शिकत असून तो मुंबईत एकटाच राहतो. त्याचे पालक आणि नातेवाईक गावाकडे राहतात परंतु आता त्याच्या देखभालीसाठी मित्र मदतीला धावून आले आहेत तसेच त्यांनी तात्काळ त्याच्या कुटुंबीयांना देखील या अपघातासंदर्भात कळविले आहे. सध्या तीर्थवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्यावेळी तीर्थसोबत हा अपघात झाला, त्यावेळचा एक व्हिडीओही समोर आला आहे. त्यामध्ये दिसून येते की, तीर्थ बेरा हा उडी मारतो आणि जम्पिंग गेमची स्प्रिंग तुटते. आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिस ठाण्यात गेम झोनच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
https://twitter.com/pravinwakchoure/status/1672311917900079134?s=20