मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एकमेकांना शिवीगाळ करत केस ओढत चापट्या बुक्क्यांनी ही हाणामारी सुरु असल्याचे कॅमेरात कैद झाले आहे. अंकिता शांतीनाथ खाणे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात म्हटले आहे की, लोकलमध्ये महिलांमध्ये जुंपली,व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, हा व्हिडीओ कधीचा आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.