कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियामुळे अनेक फायदे तथा सोयी सुविधा उपलब्ध होत असताना या माध्यमाचा वापर करून काही वाईट प्रवृत्तीचे लोक गुन्हेगार प्रकार देखील करतात. त्यामुळे सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. अशाच प्रकारे इंस्टाग्रामवर एका अनोळखी तरुणांने अल्पवयीन तरुणीशी ओळख करून सलगी वाढविली. कालांतराने त्यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध निर्माण झाले. मात्र याचा फायदा घेत त्या तरुणाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून रेल्वेतून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु तपासाचे चक्र फिरवत रेल्वे पोलिसांनी त्या तरुणाला ४८ तासाच्या आत बेड्या ठोकल्या. दरम्यान, कल्याण मधील या घटनेने काही काळ सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रेल्वे प्रवासात तरुणी बेपत्ता
मुंबईतील धारावी परिसरात एका गरीब कुटुंबात सतरा वर्षाची तरुणी आपल्या कुटुंबासह तर रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एका खेडयात कुणाल रविंद्र रातांबे (वय २३) हा गावात राहतो. त्यातच काही महिन्यापूर्वी इन्स्टाग्रामवर या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघात मैत्री होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या मोबाईल वरून सतत संपर्कात होते. तरुणाला तिला भेटल्याशिवाय चैन पडणार नव्हती, त्यासाठी त्यांनी एक वेगळीच योजना आखली, आणि तिचे अपहरण करण्याचे ठरविले. त्यामुळी ही तरूणी आपल्या कुटुंबासह सोलापूरहून कल्याणला जाणाऱ्या गदक एक्सप्रेसने प्रवास करत होती. याच दरम्यान रेल्वे प्रवासात ती बेपत्ता झाल्याची तिच्या पालकांना माहिती मिळाली. त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
सीसीटीव्ही फुटेज तपासले
एका तरुण मुलीचे अपहरण झाल्याने लगेच त्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आणि रेल्वे स्थानकावर मोठी खळबळ उडाली. मात्र रेल्वे पोलिसांनी या घटनेची तातडीने चौकशी सुरू केली. तसेच सर्व रेल्वे स्टेशनवर संपर्क साधून माहिती घेणे सुरू केले. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. त्यानंतर कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे तरुणाचा शोध घेतला आणि त्याला ४८ तासातच बेड्या ठोकल्या.
कारण गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पथक घेऊन कर्जत व कल्याण रेल्वे स्थानकातील घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एका फुटेजमध्ये मुलगी एकटीच कल्याण रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसमधून खाली उतरुन जाताना दिसली. त्यावेळी तिच्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक तपास केला. यात मुलगी ही कर्जत तालुक्यातील प्रियकर कुणालच्या घरी असल्याची माहिती मिळाली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तातडीने तपास चक्र फिरवत कुणालच्या घरी धाड टाकली, त्यानंतर त्याच्या घरातून पीडित मुलीसह ताब्यात घेऊन कल्याणला आणले त्या तरुणाची अधिक चौकशी केली असता, त्याने इन्स्टाग्रामवर आमची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाल्याने तिचे अपहरण केल्याची कबुली दिली आहे.
railway police shackled youth in 48 hours…
Mumbai Kalyan Minor Girl Kidnapped Railway
Police Arrest Love Affair Instagram