रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चारही मुलीच झाल्या… मुलगा नसल्याने क्रूर पित्याने केले हे भयानक कृत्य…

by India Darpan
ऑगस्ट 9, 2023 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
crime 6


कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधुनिक काळात मुलगा आणि मुलगी हे समान मानले जातात, त्यामुळे मुला-मुलींमध्ये भेद केला जात नाही, असे म्हटले जाते परंतु अद्यापही काही समाजात आणि अविचारी नागरिकांमध्ये ‘मुलगा हाच वंशाचा दिवा ‘ अशी भावना खोल तथा घट्ट रुतून बसली आहे. त्यामुळेच मुलगाच हवा या अट्टाहासापाई काही लोक काहीही करायला तयार होतात. कल्याण शहरात तर एका इसमाने चारही मुली झाल्याने काय करावे ? तर चक्क रेल्वे स्टेशनमधील प्रतिक्षागृहातील एका महिलेचा लहान मुलगा पळविला. आणि तो रेल्वेमधून पसार होत होता. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे या इसमाला तात्काळ अटक करण्यात आली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

रेल्वे स्टेशनवर
रेल्वे स्टेशन हा नेहमीच गजबजलेला परिसरात असतो. इथे कोण काय चोरी करेल ते सांगता येत नाही, कल्याण रेल्वे स्टेशन बालकाची चोरी झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे करण गुप्ता आणि त्यांची पत्नी शुभांगी गुप्ता हे दोघे मजुरीचे काम करतात. त्यांना २ वर्षाची किर्ती नावाची मुलगी कीर्ती आणि ४ महिन्याचा अथर्व हा मुलगा अशी दोन मुले आहेत. कपडे धुण्यासाठी चांगली जागा व पाणी नसल्याने ते दाम्पत्य सकाळी कपडे धुण्यासाठी ते कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये आले होते. मात्र, साबण नसल्याने आपल्या दोन्ही मुलांना बाहेर खेळताना सोडून ते दोघे साबण घेण्यासाठी स्टेशन बाहेर आले. यावेळी त्यांच्या मुलांसोबत आणखी चार मुली त्या ठिकाणी खेळत होत्या. त्या ठिकाणी एक जोडपे होते. त्यांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगून दोघे साबण आणण्यासाठी गेले. मात्र परतल्यानंतर त्यांचा मुलगा तेथे नसल्याने त्यांना धक्काच बसला. तसेच अथर्व आणि त्यांच्यासोबत खेळत असलेले चारही मुली तिथे नव्हत्या. करणने आजूबाजूला आपल्या मुलाचा शोध घेतला मात्र मुलगा आढळून आला नाही. अखेर त्याने कल्याण रेल्वे स्टेशनवरील गुन्हे शाखा पोलीस ठाणे गाठले.

दाम्पत्याचा आरडाओरडा
आपला चिमुरडा हरवल्याने या दाम्पत्याने आरडाओरडा सुरू केला, त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील गोळा झाले.कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मुलाचे अपहरण झाल्याची एकच चर्चा सुरू झाली. याप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेत फिर्याद दिली असता पोलीसांनी या मुलाचा शोध सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मुलाच्या शोधासाठी पथके नेमली. त्यानंतर रात्री ८ वाजता एक इसम अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळून आला. तो नाशिकला जाणारी रेल्वे पकडण्याच्या घाईत होता.

८ तासात मुलाचा शोध
रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेत, मुलाची सुटका केली. विशेष म्हणजे पोलीसांनी तपास करत अवघ्या ८ तासात या मुलाचा शोध घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कचरु वाघमारे असे मुलाला अपहरण केलेल्याचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे या वाघमारेला चार मुली आहेत. मुलाच्या हव्यासामुळे त्याने या मुलाचे अपहरण केल्याचे तपासात उघड झाले आहे. चौकशी दरम्यान या व्यक्तीचे नाव कचरू वाघमारे असल्याचे कळाले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Kalyan Crime Police Kidnapping Child
railway station Arrest

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोलापूरच्या डाळिंबाची प्रथमच अमेरिकेला निर्यात… असे झाले यशस्वी…

Next Post

अधिक (पुरुषोत्तम) मास पोथी अध्याय २३वा… उपवास का करावा (व्हिडिओ)

Next Post
purushottam adhik mas

अधिक (पुरुषोत्तम) मास पोथी अध्याय २३वा... उपवास का करावा (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011