कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कल्याण शहर हे असे एकेकाळी शांतता प्रिय शहर समजले जात होते. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये तेथे गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते. दररोज येथे काहीतरी घडत असते, भर रस्त्यात एका माथेफिरूने बस अडवून बस चालकावर चक्क कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बस चालकाने प्रतिकार केल्याने या माथेफिरूने कोयत्याने बसची तोडफोड केली. इतकेच नव्हे आणखी दोन बसची तोड फोड केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे कल्याण रामबाग परिसरात मोठी का उडाली प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले .
थेट हातात कोयता घेऊन आला
याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण शहरात सकाळी आणि सायंकाळच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी असते. अचानकपणे माथेफिरु तथा मानसिकदृष्टया कमकुवत असलेल्या बाळू साबळे इसमाने चांगलाच गोंधळ घातला. सायंकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिम राम बाग परिसरात ही घटना घडली. या माथेफिरूने हातात कोयता घेत केडीएमटीची शहर बस अडवून बस चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान दाखवत मोठ्या धाडसाने बस चालक व वाहकाने या माथेफिरूला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले.
पत्नी सोडून गेल्याने तणावात
काही वर्षांपूर्वी बाळूची पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर तो मानसिक तणावात होता. याच मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.चालकाने प्रतिकार केल्याने या माथेफिरूने बसवर कोयत्याने प्रहार करत बसेसच्या काचा फोडल्या. यानंतर पाठीमागून येणाऱ्या दोन बसेसच्या काचा फोडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या माथेफिरूला अटक केली असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
Mumbai Kalyan Crime Man Attack Bus Police
Driver Wife Left