कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही शहरांमध्ये अनोळखी व्यक्ती एखादा पत्ता शोधण्यासाठी चौकात रिक्षावाले किंवा पानटपरीवाले यांना विचारणा करतात, तसेच काहीजण रस्त्याने जात असलेल्यानाही पत्ता विचारतात, अलीकडच्या काळात मोबाईलवरील गुगल मॅप मुळे पत्ता शोधणे सोपे झाले आहे, तरी अनेक जण पत्ता विचारत असतात. परंतु पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एखाद्याचा मोबाईल, पाकीट चोरणे किंवा सोन्याचा ऐवज लांब पास करण्याच्या घटनाही नेहमीच घडतात. कल्याण शहरातील अशीच घटना घडली. एकाने पत्ता विचारण्याच्या पाहण्याने एका बाऊन्सरचा मोबाईल चोरला व धूम ठोकली, त्याच्या पाठलाग करताना बाउन्सर ही जखमी झाला या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दोन तासात केली अटक
अंकुर शिंदे हा उल्हासनगर कँम्प भागातील महात्मा गांधी नगरमध्ये आईसह राहतो. तो ठाणे शहरातील एका बिल्डर्सकडे बाऊंसर म्हणून नोकरीला आहे. त्यातच नेहमी प्रमाणे ठाणे येथून एका खाजगी वाहनाने येऊन कल्याण पश्चिम भागातील दुर्गाडी किल्ला येथील चौकात असलेल्या बस स्थानकाजवळ उतरला. त्यानंतर उल्हासनगर मधील घरी जाण्यासाठी चौकात रिक्षा, बसची वाट पाहत असतानाच त्या ठिकाणी एका दुचाकीवरून दोघे अनोखळी तरुण येऊन त्याला पत्ता विचारण्याचा बहाणा केला. मात्र त्यांनी अकुंरच्या खिशातील महागडा मोबाईल चोरट्याने धूम स्टाईल पळवून नेल्यानंतर दुचाकीवरील चोराला पकडण्यासाठी पाठलाग करत असतानाच, चोरट्याने बाऊंसरला दुचाकीसह फरफटत नेल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्या चोरट्याला दोन तासातच अटक केली आहे. फरहाद खान असे अटक चोरट्याचे नाव आहे.
दारू पिण्यासाठी पैसे हवे म्हणून केले हे कृत्य
एकजण पत्ता विचारत होता त्याचवेळी दुसऱ्या दुचाकी आलेल्या चोरट्याने बाऊंसर अंकुरच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल हिसकावून पळून जात असतानाच, बाऊंसरने त्याचा पाठलाग करत त्याची दुचाकीला मागून पकडले. मात्र चोरट्याने दुचाकी धूम स्टाईलने नेत बाऊंसरला काही अंतरापर्यत फरफटत नेल्याने हातापायाला गंभीर दुखापत झाली. अशा परिस्थितीत बाऊंसरने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला. दरम्यान तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड याच्याशी संपर्क साधला, तेव्हा बाऊंसर अंकुरने दिलेल्या दुचाकीच्या वर्णनावरू तात्काळ दुसऱ्या बीट चौकीला कळवले आणि तिघापैकी एका आरोपीला दोन तासात कल्याण परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी फरहाद खान आणि फरार असलेल्या त्याच्या साथीदाराला दारू पिण्यासाठी पैसे नसल्यामुळे बाऊंसरचा महागडा मोबाईल पळवला होता. आता मोबाईल पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत करून आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
An incident where a thief stole an expensive mobile phone from a bouncer's pocket Mumbai Kalyan Crime bouncers theft