मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कला संचालनालयामार्फत 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) 2022-23 आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंगळवार 10 जानेवारी, 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे होणार आहे. हे प्रदर्शन 10 ते 16 जानेवारी, 2023 या कालावधीत होणार आहे. प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे, असे प्र. कला संचालक राजीव मिश्रा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रदर्शनाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित राहणार आहेत. सन 2020-21 यावर्षीचा “कै. वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार” शिल्पकार राम सुतार तसेच ज्येष्ठ कलाकार प्रमोद रामटेके यांचा व 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त कलाकारांचा शासनाच्या वतीने सत्कार समारंभ होणार आहे.
पारितोषिक प्राप्त कलाकार :
सुरभी कांचन गुळवेलकर (रेखा व रंगकला), प्रतिक बळीराम राऊत (रेखा व रंगकला), प्रसाद सुनील निकुंभ (रेखा व रंगकला), विवेक वसंत निंबोळकर (रेखा व रंगकला), अभिजित सुनील पाटोळे (रेखा व रंगकला), वैभव चंद्रकांत नाईक (रेखा व रंगकला), रोहन सुरेश पवार (शिल्पकला), अजित महादेव शिर्के (शिल्पकला) राहुल मच्छिंद्र गोडसे (उपयोजित कला), श्वेता श्याम दोडतले (उपयोजित कला), अनूज संजय बडवे (उपयोजित कला), दीक्षा संदेश कांबळे (उपयोजित कला), विजय रामभाऊ जैन (उपयोजित कला), किन्नरी जितेंद्र तोंडलेकर (मुद्राचित्रण), राकेश रमेश देवरुखकर (दिव्यांग विभाग) या कलाकारांचा पारितोषिक व रक्कम 50 हजार रुपये देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
Mumbai Kala Pradarshan from today
Art Exhibition Painting