मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जोगेश्वरीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक २६ वर्षांचा तरुण स्वयंपाक करणाऱ्या महिलेच्या खोलीत शिरला आणि त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. जोगेश्वरी पश्चिममधील एका वसतीगृहातील ही घटना आहे.
काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील एका विद्यापीठात सुरक्षा रक्षकानेच मुलींचे फोटो काढून त्यांची माहिती कुणाला तरी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. आता जोगेश्वरी पश्चिम येथील एका वसतीगृहातील विद्यार्थ्याने स्वयंपाक करणाऱ्या महिलेच्या खोलीची खिडकी तोडून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडित महिला वसतिगृहात जेवण बनविण्याचे काम करते. आरोपी विद्यार्थी त्याच वसतिगृहात वास्तव्यास आहे. या विद्यार्थ्याची पीडित महिलेवर नजर पडली. त्याने मध्यरात्री अत्याचार करण्याच्या प्रयत्नासाठी महिलेच्या खोलीची खिडकी तोडली. खिडकी तोडल्याचा आवाज येताच महिला खडबजून जागी झाली. महिलेने जोरजोरात आरडाओरड केली. महिलेच्या आवाजामुळे वसतिगृहातील सर्वजण जागे झाले. त्यानंतर विद्यार्थ्याने घटनास्थळावरून पळ काढला. या महिलेने तातडीने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
पहाटे अडीच वाजता फोडली खिडकी
आरोपी तरुणाने पहाटे अडीच वाजता खिडकी फोडली आणि खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला. ओशिवरा पोलिसांनी विद्यार्थ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विद्यार्थी अविनाश (२६ वर्षे) असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सध्या फरार असून ओशिवरा पोलीस आरोपी विद्यार्थ्याचा शोध घेत आहेत.
महिलेने ओरड केली म्हणून
खिडकीचा आवाज होताच महिला खडबडून जागी झाली. त्यानंतर तिने आरडाओरड केली. तिच्या आवाजामुळे काहीतरी गडबड असल्याचे वसतीगृहात लक्षात आले. दरम्यान, आरोपीने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत वसतीगृहातील सर्व विद्यार्थी जागे झाले होते.
Mumbai Jogeshwari Crime Hostel Student Women Molestation
Attempt Abuse