बुधवार, ऑगस्ट 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव’… राज्य सरकारची घोषणा…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 26, 2023 | 5:12 am
in संमिश्र वार्ता
0
Mumbai e1684862213483

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर ‍20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली फाऊंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील प्रथितयश स्टेक होल्डर्स सहभागी होणार असल्याची माहिती मंत्री श्री. महाजन यांनी दिली. मंत्री श्री. महाजन यांची उद्योगपती श्री. महिंद्रा यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी पर्यटन विषयावर विस्तृत चर्चा झाली. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा उपस्थित होत्या.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या फाऊंडेशनमध्ये शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश असेल. फाऊंडेशनच्या निर्मितीमुळे अशा महोत्सवांच्या आयोजनात सातत्य राहील व पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक, स्टेक होल्डर्स, मुंबईतील उद्योजक व इतर क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींच्या सहभागामुळे महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळणार आहे.

राज्याच्या कला व संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला, विविध खाद्य संस्कृती, सायकलिंग टूर, हार्बर टूरिझम,वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टिव्हीटीज आदी साहसी क्रीडा प्रकारचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये सीटी टूर आयोजकांना एका छत्राखाली आणून शॉपिंग मॉल, कला दालने, चित्रपटगृह, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाइडेड सीटी टूर, हेरिटेज वॉक, नेचर वॉक, फोटोग्राफी, योगा कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक व स्टेक होल्डर्स यांचा समावेश असलेल्या परिचय सहल (FAM Tour), चित्रपट, फॅशन शो इ. उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या महोत्सवामुळे पर्यटना व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढीस मदत होईल, मुंबईतील पर्यटन वृद्धीस चालना मिळून राज्याच्या महसुलात देखील वाढ होईल, असे पर्यटन मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयी-सुविधा देण्याबरोबरच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

Mumbai International Festival Maharashtra Government Tourism

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत एक दर्शन (भाग १५)… ईश्वर हृदयात भेटतो…

Next Post

श्री विष्णु पुराण… भर सभेत श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध का केला?…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
bhagwan vishnu

श्री विष्णु पुराण... भर सभेत श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध का केला?...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना धनलाभाचे संकेत मिळतील, जाणून घ्या, बुधवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 5, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओपदी या अधिका-याची नियुक्ती

ऑगस्ट 5, 2025
Screenshot 20250805 190544 WhatsApp 1

नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा

ऑगस्ट 5, 2025
IMG 20250805 WA0276 1

आंदोलनानंतर फुटलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू होणार

ऑगस्ट 5, 2025
Rorr EZ Sigma Electric Red I 16 9

ओबेन इलेक्ट्रिकने नेक्स्ट-जेन रॉर ईझी सिग्मा लाँच केली…या तारखेपासून डिलिव्हरीला सुरुवात

ऑगस्ट 5, 2025
fir111

गिफ्ट हाऊसमध्ये बालकामगार, व्यावसायीकास पडले चांगलेच महागात…गुन्हा दाखल

ऑगस्ट 5, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011