इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुंबई इंडियन्स ग्लोबलने किरॉन पोलार्डला एमआय एमिरेट्स चे कर्णधार म्हणून घोषित केले, तर राशिद खानकडे एमआय केपटाऊनच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स आता फक्त देशांतर्गत सामन्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीसाठी त्यांचे T20 संघ जाहीर केले आहेत.
जानेवारी 2023 मध्ये सुरू होणाऱ्या T20 खेळांमध्ये तुम्ही मुंबई इंडियन्स वन फॅमिली, एमआय एमिरेट्स आणि एमआय केपटाऊनमधील नवीन सदस्यांना पाहण्यास सक्षम असाल. एमआय ग्लोबलने आपल्या दोन्ही संघांसाठी केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड केली असून हा एमआय ग्लोबल संघ यशाचे नवे आयाम निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.
यावेळी बोलताना श्री. आकाश अंबानी म्हणाले “२०२३ क्रिकेट गेम्ससाठी एमआय ग्लोबल वन परिवाराच्या नवीन कर्णधारांची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या कर्णधारांकडे प्रतिभा, अनुभव आणि जिंकण्याची जिद्द आहे. आम्हाला खात्री आहे की पॉली आणि रशीद आमच्या एमआय ग्लोबलचे सौहार्द वाढवतील आणि क्रिकेटच्या जगात एक मोठा ब्रँड बनवतील. आमच्या एमआय एमिरेट्स आणि एमआय केपटाऊन संघांच्या प्रशिक्षकांसह हे दोघे, यूएई आणि केपटाऊनमधील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकून संघाला एक शक्ती बनवतील.”
एमआय एमिरेट्स संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्ड करेल आणि त्यात डियान ब्राव्हो, निकोलस पूरन, ट्रेंट बोल्ट आणि इम्रान ताहिर यांसारखे क्रिकेट जगतातील काही दर्जेदार खेळाडू असतील, जे एमिरेट्स येथे 13 जानेवारी 2023 रोजी सुरू होणाऱ्या ILT20 गेम्समध्ये आपला ठसा उमटवतील. दुसरीकडे, राशिद खानच्या नेतृत्वाखाली, एमआय केपटाऊन संघात दक्षिण आफ्रिकेचे कागिसो रबाडा, डेवाल्ड ब्रेविस, रेशी व्हॅन डर डसेन यांसारखे वेगवान गोलंदाज तसेच जोफ्रो आर्चर, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन यांसारखे क्रिकेट जगतातील ताऱ्यांच्या समावेश आहे. दक्षिण आफ्रिका T20 10 जानेवारी 2023 रोजी केपटाऊनमध्ये सुरू होईल.
Mumbai Indians Global Captains Declare