मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वप्नांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत बॉलीवूडचं वेड अनेकांना ओढून आणतं. प्रत्येकाच्या वाट्याला यश येईलच असे नाही. पण यश आलं नाही म्हणून वाईट मार्गाला लागणारेही अनेक असतात. अश्याच एका भोजपुरी अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करताना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन कुमारी तेतू गोपी (२४) असे या भोजपुरी अभिनेत्रीचे नाव असून तिला अटक केली आहे. तिच्या चौकशीमध्ये आणखी काही लोकांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करताना पोलिसांनी भोजपुरी अभिनेत्रीवर गुन्हा दाखल केला आहे. तर तीन मॉडेल्सची अटक करून सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे भोजपुरी अभिनेत्रीवर तरुणींना बळजबरीने या व्यवसायात ओढण्याचाही आरोप आहे.
संबंधित परिसरात तिची ओळख दलाल म्हणून आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेला गोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविले जात असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पूर्ण शहानिशा करून पोलिसांनी धाड टाकली. अटक झालेल्या महिलेने आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये हा व्यवसाय सुरू केल्याचे पोलिसांना कळाले होते. पोलिसांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास धाड टाकली असताना हे सेक्स रॅकेट उघडकीस आलं.
वेबसिरीजमध्ये काम
आरोपी महिला भोजपुरी फिल्म सृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री असून तिने ‘लैला मजनू’ या भोजपुरी फिल्ममध्ये तसेच ‘जॉमेस्टिक बॉक्स’ या वेब सिरीज आणि ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ या भोजपुरी कॉमेडी एपिसोडमध्ये काम केलेले आहे. तसेच तिने भोजपुरी, हिंदी, पंजाबी या विविध भारतीय भाषांमधील अल्बम सॉंगमध्ये लीड रोल केलेला आहे.
पंधरा दिवसांत दुसरी घटना
मुंबई पोलिसांनी ५ एप्रिलला अशाच एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. अंधेरीत काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या वतीने चांगल्या वस्त्यांमध्ये हा व्यवसाय चालविला जात होता. या प्रकरणात पोलिसांनी ज्यांना अटक केली त्यातील एकाने ज्योतिषी असल्याचा दावा केला होता. पण, ती व्यक्ती देह व्यापारात सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
Mumbai Hotel High Profile Sex Racket Burst Bhojpuri Actress Arrested