मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई उच्च न्यायालयात हपाल-शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत इयत्ता सातवी उत्तीर्ण उमेदवारालाही अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये तब्बल ६० हजार रुपयांचा प्रति महिना पगार मिळणार आहे.
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ अंतर्गत शिपाई /हमाल पदांसाठी १६० पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२३ असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. एकूण रिक्त पदे १६० आहेत. या सर्व पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. या पदासाठी किमान पात्रता इयत्ता सातवी उत्तीर्ण आहे.
नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. या पदासाठी खुल्या प्रवर्गातील वय १८ ते ३८ वर्षाचे उमेदवार अर्ज करू शकणार आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयोमर्यादेत ५ वर्ष सूट देण्यात आली आहे. अर्ज शुल्क २५ रुपये आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात २७ मार्च २०२३ पासून सुरू होणार असून ७ एप्रिल २०२३ पर्यंतला मुदत संपणार आहे.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी https://drive.google.com/file/d/15uFzh02qAR0RmARdqVSiQYGAjg0MtYTg/view ही लिंक तसेच https://bombayhighcourt.nic.in/index.php या अधिकृत बेवसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai High court Recruitment 60 Thousand Salary Job Vacancy