मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डीएनए चाचणीचा निष्कर्ष पॉझिटिव्ह आला तर, संबंधित आरोपीविरुद्धचा तो पुरावा ठरू शकतो. पण चाचणीचा निष्कर्ष निगेटिव्ह आला तर, रेकॉर्डवर उपलब्ध असलेल्या इतर बाबींचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल, असे उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालाच्या एका निर्णयाचा हवाला देत सांगितले.
अशाप्रकारे, जरी गरोदर बलात्कार पीडितेची डीएनए चाचणी आरोपीकडे बोट दाखवत नसली तरी, बलात्कार झालाच नाही, असा तो निर्णायक पुरावा असू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले, त्यामुळे अन्य पुराव्यामुळे आरोपीला शिक्षा होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. नवी मुंबईतील एका व्यक्तीचा जामीन अर्ज फेटाळताना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी ही टिप्पणी केली आहे. न्यायालयाने 26 जुलै रोजी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला होता.
एका बलात्कार प्रकरणात आपली डीएनए चाचणी गर्भाच्या चाचणीशी जुळत नसल्याने आपला संबंध पीडितेच्या बलात्काराशी जोडला जाऊ नये, हा आरोपीने केलेला युक्तीवाद न्यायमूर्ती भारती डोंगरे यांनी फेटाळला. ‘डीएनए विश्लेषणाचा पुरावा पुष्टीकरणासाठी वापरला जाऊ शकतो, यात दुमत नाही. जामीनासाठी अर्ज करणारा बाळाचा पिता नसल्याचा निष्कर्ष डीएनए चाचणीतून समोर आला असला आहे. तरी, पीडितेच्या जबाबावर अविश्वास दाखवता येणार नाही. तिने फौजदारी प्रक्रिया कलम अंतर्गत नोंदवलेल्या जबाबात त्याने तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचे म्हटले आहे. डीएनए चाचणी ही ठोस पुरावा ठरत नाही, मात्र पुष्टी देणारा पुरावा म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो, असे न्यायमूर्तींनी दिलेल्या एका निर्णयात नमूद केले आहे.
आपल्या मुलांसाठी सांभाळ करणारी आया म्हणून काम करणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर एका नराधमाने सलग १० दिवस बलात्कार करून तिला धमकावले. कालांतराने त्या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी तिला डॉक्टरकडे नेले, तेव्हा तिला गर्भधारणा झाल्याचे उघड झाले. तेव्हा तिने आईला घडला प्रकार सांगितला आणि पोलिसांकडे एफआयआर नोंदवला. त्याआधारे नवी मुंबई पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली.
या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने सांगितले की, या टप्प्यावर पीडितेच्या जबाबावर संशय घेण्याचे कोणतेही कारण नाही. पीडितेच्या कुटुंबाची असुरक्षित परिस्थिती लक्षात घेता पीडितेवर आणि तिच्या कुटुंबावर आरोपीक़डून दबाव आणला जाण्याची देखील शक्यता आहे.
नवी मुंबईच्या नेरूळ पोलिस ठाण्यात त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपीने पीडित मुलीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. त्यांच्या काम करीत असलेल्या व्यक्ती विरोधात त्यांनी अस कृत्य केलं आहे. न्यायालयाने निरीक्षण केले की डीएनए चाचणी नकारात्मक असली तरीही, पीडितेच्या साक्षीवर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही.
पीडितेने विशेषत: अर्जदाराने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीने तिला काही रकमेचे आमिष दाखवले आणि ही घटना कोणत्याही व्यक्तीला सांगू नका अशी धमकी दिली, ज्यामुळे तिला गप्प बसावे लागले. जेव्हा तिची गर्भधारणा उघडकीस आली तेव्हा तिने तिच्या पालकांना सांगितले की गर्भधारणेसाठी अर्जदार जबाबदार आहे.
डीएनए जुळला नाही म्हणून बलात्काराचा आरोप सिद्ध होत नाही, असे नाही. आरोपीने पिडित मुलीच्या गरीब असण्याचा फायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार केले याचे घटनात्मक पुरावे आहेत, असा युक्तिवाद वकिलांनी केला. तसेच न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार डीएनए चाचणी हा एकमेव पुरावा नसून अन्य पुरावे ही महत्त्वाचे असतात.
Mumbai High Court Rape Case Evidence
DNA Test Legal