मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा तर भाजप नेते किरीट सोमय्यांना जोरदार दणका दिला आहे. मुश्रीफ यांच्याशी संबंधित कारवाईची कागदपत्रे सोमय्या यांना सर्वात आधी कशी उपलब्ध होतात, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. तसेच, याप्रकरणी उच्च न्यायालयाने न्यायालयीने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, येत्या २४ एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांच्यावर कठोर कारवाई करु नये, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केली. आज दुसऱ्यांदा त्यांच्या विविध ठिकाणांवर छापेमारी करण्यात येत आहे. असे असतानाच कोल्हापूर येथे दाखल झालेला एफआयआर रद्द करावा, या मागणीसाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी आज झाली. या सुनावणीत न्यायालयाने मुश्रीफांना मोठा दिलासा दिला आहे. येत्या २४ एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे न्यायालयाने पोलिसांना बजावले आहे.
तर, मुश्रीफ यांच्या प्रकरणात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हं सातत्याने आरोप करीत आहेत. त्यांच्याच तक्रारीमुळे ईडीकडून कारवाई केली जात आहे. मात्र, न्यायालयाने सोमय्यांना मोठा झटका दिला आहे. मुश्रीफ यांच्यावर आरोप करणाऱ्या सोमय्यांचा मुश्रीफ यांच्या प्रकरणाशी थेट कोणताही संबंध नाही. असे असतानाही न्यायालयाच्या आदेशांची आणि एफआयआरची प्रत सर्वात आधी सोमय्यांना कशी उपलब्ध होत, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. पुणे सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
https://twitter.com/barandbench/status/1634093285697282048?s=20
Mumbai High Court on Hasan Mushrif Kirit Sommaiyya