मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रमेश धनुका यांनी आज शपथ घेतली. मुंबईत राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायमूर्ती रमेश धनुका यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
धनुका हे मुंबई उच्च न्यायालयाचे ४६ वे मुख्य न्यायाधीश आहेत. २६ मे रोजी केंद्र सरकारने धनुका यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली होती. धनुका हे ३० मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे केवळ तीन दिवसांचा कालावधी त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून मिळणार आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाला सध्या उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्यामुळे केवळ सोमवार आणि मंगळवार असे दोनच कामाचे दिवस ते कार्यरत असतील.
Mumbai High Court Justice Governor Oath