मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात आर्यनसह त्याचे मित्र मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट हे गेल्या २० दिवसांपासून तुरुंगात आहेत. जामीनासाठी अर्ज केला. मात्र, तो वारंवार फेटाळण्यात आला. नार्कोटिक्स विभागाच्या न्यायालयात दिलासा मिळत नसल्याने अखेर शाहरुख खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे निश्चित केले. उच्च न्यायालयात तीन दिग्गज वकीलांची फौज उभी करण्यात आली. या तिन्ही वकीलांनी जोरदार युक्तीवाद करीत न्यायालयाला जामीन अर्जावर गांभिर्याने विचार करण्यास भाग पाडले. अखेर आर्यन, मुनमुन आणि अरबाज या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीश एन डब्ल्यू सांब्रे यांनी सांगितले की, तिघांना जामीन मंजूर करीत आहोत. याचे विस्तृत आदेश उद्या पर्यंत काढण्यात येतील. त्यामुळे आर्यन, मुनमुन आणि अरबाज या तिघांना आज आणि उद्याची रात्रही तुरुंगातच घालावी लागणार आहे. या तिघांचीही शनिवारीच तुरुंगातून सुटका होणार आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1453681030095773699