गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने घेतला हा मोठा निर्णय

नोव्हेंबर 16, 2022 | 5:15 am
in राज्य
0
govar vaccination 1140x760 1

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. हा उपक्रम मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये दिनांक १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबई शहरातील बालकांचे लसीकरण व स्वच्छ व सुंदर मुंबई उपक्रमाचा आढावा घेतला, त्यावेळी श्री. लोढा बोलत होते.

बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, महापालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी तसेच सहआयुक्त, उपआयुक्त व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले, “मुंबई शहरात गोवर या आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने तातडीने बालकांच्या लसीकरणावर भर द्यावा. लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे करावे. तसेच ज्या बालकांना गोवरची लागण झाली आहे त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार सुरू करावेत”.

स्वच्छ व सुंदर मुंबई उपक्रमासाठी १८८ कोटी रूपयांची तरतूद
स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी १८८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, पदपथ, रेल्वे प्लॅटफार्म, उद्याने, मंडई, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, सागरी किनारे, पर्यटन स्थळे, फ्लायओव्हर या ठिकाणांची मिशन मोडमध्ये स्वच्छता करण्यात येणार आहे. ३९०० स्वच्छतागृहांची दुरूस्ती, नव्याने उभारणी करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री.लोढा यांनी यावेळी दिली.

स्वच्छ व सुंदर मुंबई अभियानात शासकीय तसेच निमशासकीय संस्थांबरोबरच नागरिक, खाजगी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, गृहसंकुले यांना सहभागी करून अभियान सर्वसमावेशक करणे, अभियान कालावधीत सर्वस्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून स्वच्छतेच्या सवयींमध्ये आमुलाग्र बदल (Behavioral Change) घडवून आणणे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरांतील असलेल्या विविध विभाग कार्यालयांमध्ये ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाची अंमलबजावणीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले, असेही पालकमंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनीही घेतली दखल
गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे ते जाणून घेतले.

ज्या मुलांना लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग फैलावणार नाही याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक आहे तसेच बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले.

Mumbai Govar Measles BMC Big Decision

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधिमंडळ परिसर आणि आमदारांच्या वास्तव्यावर राहणार सीसीटीव्हीची नजर; हिवाळी अधिवेशनासाठी निर्णय

Next Post

शिवसेना आणि भाजप युती का तुटली? त्यावेळी नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांनी सगळं सविस्तर सांगितलं…. (Video)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
संग्रहित छायाचित्र

शिवसेना आणि भाजप युती का तुटली? त्यावेळी नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांनी सगळं सविस्तर सांगितलं.... (Video)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011