मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षात सायबर क्राईम मोठया प्रमाणात वाढले आहे.आजच्या काळात कोण कुणाची कशी फसवणूक करेल हे सांगता येत नाही. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून तर फसवणुकीचे खूपच प्रकार वाढले आहेत. त्यामुळेच सायबर गुन्ह्याची पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर नोंद होत असते. ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवताना मोठी फसवणूक होते, खरे म्हणजे ऑनलाईन पैसे कसे पाठवावेत, याची व्यवस्थित माहिती असायला हवी. परंतु सायबर गुन्हेगारी व फसवणूक करणारे भामटे हे कोणाचीही कशाही प्रकारे फसवणूक करतात. फेसबुकवर ओळख झालेल्या मित्राने वाढदिवसाचे महागडे गिफ्ट तथा भेट वस्तू पाठवण्याची बतावणी केली. याद्वारे प्राथमिक शाळेतील शिक्षिकेला सुमारे १२ लाख ३५ हजार ६०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार गोरेगाव येथे घडला आहे. त्यानंतर फसवणूक झाल्याची लक्षात येतात या शिक्षिकेने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.
गोड बोलण्याला फसली
गोरेगाव तालुक्याच्या चिचगाव टोला मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही शिक्षिका कार्यरत आहेत. या शिक्षिकेची मूळचा ब्राझीलचा असलेला व अमेरिकेत वास्तव्य करत असलेल्या जॅक्सन जेम्स या तरुणाशी फेसबूकवर मैत्री झाली. या शिक्षिकेने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर जॅक्सन जेम्स या तरुणाने माझा वाढदिवस आहे, जॅक्सन म्हणाला की, मी तुम्हाला गिफ्ट पाठवतो तुमचा पत्ता सांगा ? असे म्हणत शिक्षिकेकडून पत्ता मागविला, त्यानंतर त्या पत्त्यावर गिफ्ट पाठविल्याचे नाटक केले. बिचारी ती शिक्षिका त्यांच्या गोड बोलण्यास फसली. त्याने पहिल्यांदा शिक्षिकेकडून कस्टम क्लिअरन्स चार्जेसच्या नावावर ७५ हजार रुपये मागितले. त्यानंतर नो-ड्रग्ज सर्टिफिकेट व नो-टे- ररिस्ट सर्टिफिकेट करिता ७ लाख ६० हजार रुपये पाठविण्यास सांगितले.
महागड्या वस्तूंचे आमिष
जॅक्सन जेम्स या तरुणाला फेसबूकवर मैत्री करुन फसवणूक कशी करावी यात तो माहीर होता, त्याने शिक्षिकेला ७ लाखापेक्षा जास्त पैसे मागितले, ती त्याला भुलली पण पैसे कमी असल्याचे सांगत शिक्षिकेने ६ लाख ६० हजार रुपये पाठविले. त्यानंतर तरुणाने पुन्हा व्हॉट्सऍपवर मॅसेज करुन या पार्सलमध्ये अतिशय महागड्या वस्तू आहेत. त्यासाठी त्या वस्तूंच्या किमतीच्या १० टक्के १५ लाख ४५ हजार रुपये चार्जेस द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर शिक्षिकेने आधी २ लाख ३० हजार व त्यानंतर २ लाख ७० हजार रुपये चेकद्वारे याने पाठविलेल्या अकाऊंटवर पाठविले. एकूण १२ लाख ३५ हजार ६०० रुपये त्यांच्याकडून उकळून त्यांची फसवणूक केली. मात्र फसवणूक झाल्याची लक्षात येतात या शिक्षिकेने गोरेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सायबर क्राईम तथा माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Mumbai Goregaon Crime Facebook Friend Teacher Cheating
Cyber Crime