सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई-गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ; हे आहेत थांबे

by India Darpan
जून 2, 2023 | 8:47 pm
in राष्ट्रीय
0
vande bharat 680x375 1

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवार ३ जून २०२३ रोजी सकाळी ११.०५ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार दि. ३ जून २०२३ रोजी सायंकाळी ६.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे स्वागत करतील.

प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील दळणवळण सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल. ही रेल्वेगाडी देशातील १९ वी आणि राज्यातील चौथी वंदे भारत रेल्वे असेल. ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे.

या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वे गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वे गाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल, यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासांची बचत होईल. स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल.

चेन्नईस्थित इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती झाली आहे. देशभरात सध्या ७५ वंदे भारत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर मुंबईतून गांधीनगर (गुजरात), शिर्डी आणि सोलापूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या एक्स्प्रेसमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

वंदेभारत एक्स्प्रेसची गेल्या महिन्यात कोकण रेल्वेच्या मार्गावर यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर मडगावहून निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस स्वागत करतील, तसेच प्रवाशांशी संवाद साधतील.

मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे खालीलप्रमाणे :
मडगाव, करमळी, थिवी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, कोलाड, पनवेल, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई).

Mumbai Goa Vande Bharat Express

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाऊले चालती पंढरीची वाट… संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे त्र्यंबकेश्वर येथून पंढरपुरला प्रस्थान

Next Post

मुक्त विद्यापीठाचा लाचखोर परीक्षक जाळ्यात; यासाठी घेतले ५ हजार रुपये

Next Post
Corruption Bribe Lach ACB

मुक्त विद्यापीठाचा लाचखोर परीक्षक जाळ्यात; यासाठी घेतले ५ हजार रुपये

ताज्या बातम्या

rain1

मान्सून सक्रिय…पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता

जून 9, 2025
Audi A4 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ही सिग्‍नेचर एडिशन’ लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी पावणे चार लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

जून 9, 2025
Raj Thackeray

मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले….

जून 9, 2025
crime1

मिळकत खरेदी विक्रीत शेजा-यालाच गंडा…तीन संशयिताविरोधात गुन्हा दाखल

जून 9, 2025
Nashik city bus 6 e1723473271994

ऑफलाईन पद्धतीने पास काढताय? तर मग जाणून घ्या ही नवीन प्रक्रिया….

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011