रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर येथे आज एक भीषण अपघात झाला. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाजवळ शिवशाही बस आणि इर्टिगा कार यांचा अपघात झाला आहे. कारमधील ५ प्रवाशांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कारमधील ५ पैकी २ प्रवासी मयत असून इतर ३ जण गंभीर जखमी आहेत.
हा अपघात एवढा भीषण होता की त्यात कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. जखमी प्रवाशांवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. अपघात कसा घडला याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
अपघातातील प्रवाशांची माहिती अशी
मृत प्रवासी
जयवंत सावंत – वय 60 – रा. अंबरनाथ
किरण घागे – वय 28 – रा. घाटकोपर
जखमी प्रवासी
गिरीश सावंत – वय 34 – रा. अंबरनाथ
अमित भीतळे – वय 30 – रा. बदलापूर
जयश्री सावंत – वय 56 – रा. अंबरनाथ
https://twitter.com/BhavBrahma/status/1564499653638631424?t=MB4GmbQnjDsEHKRPyhdezg&s=19
Mumbai Goa Highway Shivshahi Bus Car Accident
2 Death Ertiga Car 3 Injured