मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये सायबर क्राईमचे प्रकार वाढले आहेत ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवताना मोठी फसवणूक होते, खरे म्हणजे ऑनलाईन पैसे कसे पाठवावेत, याची व्यवस्थित माहिती असायला हवी. परंतु सायबर गुन्हेगारी व फसवणूक करणारे भामटे हे कोणाचीही कशाही प्रकारे फसवणूक करतात. एका डॉक्टर महिलेची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली असून सुमारे २२ हजार रुपयांना त्यांना भुर्दंड बसला आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट
सायन रुग्णालयात सर्जन असलेल्या डॉ. वैदेही वेंकटेश्वरन (२९) सहार परिसरात राहतात. त्यांना नृत्याची आवड असल्याने त्यांनी एक महिन्यापासून अंधेरी परिसरात एक डान्स स्टुडिओ देखील सुरू केला असून त्यासंदर्भातील जाहिरात करण्यासाठी त्यांनी इंस्टाग्रामवरही अॅडव्हडाईज दिली आहे. त्यामुळे तरुण -तरूणी त्यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधत आहेत, मात्र व्हॉट्सॲपवर नृत्य क्लासचे प्रवेश शुल्क पाठवण्याच्या बहाण्याने डॉ. वदेही यांना २१ हजार ७०० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला गेला. त्या भामट्याच्या डीपीवर एका मुलीचा फोटो असून सतत प्लीज प्लीज असा मेसेज तो पाठवत असल्याने डॉ. वैदेही यांना वाटले की ती एखादी लहान मुलगी असावी, त्यामुळे ती मुलगीच विनंती करत आहे असे वाटून त्यांनी पैसे पाठवले आणि त्या फसल्या गेल्या. या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
व्हॉट्सॲपवर आला मेसेज
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून अवनी शर्मा या बोगस नावाने व्हॉट्सॲप मेसेज आला. बेले डान्स शिकायचे सांगून नृत्य क्लासचे शुल्क किती आहे, अशी विचारणा केली. डॉ. वैदेही यांनी ७०० रुपये असे सांगितल्यानंतर त्यांना ७ हजार रुपये पे केल्याचा सिस्टिम जनरेटेड असल्याप्रमाणे दिसणारा मेसेज त्यांना मिळाला. कदाचित जास्त पैसे टाकले गेले असे त्यांना वाटले तेवढ्यातच तिकडून अधिक पैसे टाकले असल्याचे सांगत ६ हजार ३०० रुपये गुगल पे वरून परत पाठवण्याचीही विनंती केली. त्या भामट्याने केली, तेव्हा ते पैसे पाठवण्याचा प्रयत्न डॉ. वैदेही यांनी केला. तेव्हा आणखी पुन्हा त्याच क्रमांकावरून १५ हजार ४०० रुपये पेड केल्याचा गुगल-पे चा स्क्रीनशॉट पाठविला, त्यामुळे पैसे देखील डॉ. वैदेही यांनी त्या क्रमांकावर परत पाठवले. परंतु तिसऱ्यांदा २८ हजार पाठविल्याचा मेसेज मिळाला, तेव्हा संशय आल्याने बँक खाते तपासले असता कोणतेही पैसे सदर क्रमांकावरून जमा झाल्याचे दिसले नाही. उलट त्यांनाच २१ हजार ७०० रुपयांचा गंडा घातला गेला होता. परंतु नंतर त्या भामट्याने संपर्कच बंद करून टाकला त्यामुळे डॉ. वैदेही यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Mumbai Doctor Women Cyber Crime Cheating
Dance Class Fees Google Pay