मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी मुंबई आणि लगतची उपनगरे ही सुरक्षित मानली जात होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर व उपनगरांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून भयानक हल्ले तसेच खूनासारख्या गंभीर घटना घडत आहेत. अशीच एक घटना करी रोड परिसरातून उघड झाली आहे. कौटुंबिक वादातून दीर व चुलत सासऱ्याने एका महिलेसह तिच्या सासूवर चाकूने खूनशी हल्ला केला. या घटनेत महिलेसह तिची सासू जखमी झाली आहे.
वादानंतर द्वेष
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबामध्ये दोन कुटुंबामध्ये वैयक्तिक कारणातून काही वाद निर्माण झाला होता, या वादाचे रूपांतर द्वेषामध्ये झाले. तसेच या वादातून त्यांनी एका महिलेसह तिच्या सासूवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिलेसह तिच्या सासूला गंभीर जखम झाली. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली आहे. श्रीधर फडतरे (वय २८) आणि चारुदत्त फडतरे (वय ६८) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
मित्राचा बळी
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत दोघांना मित्रांमध्ये वाद होऊन त्यात एकाला जीव गमावावा लागला. मित्रांमध्ये सहकार्याची भावना असते भांडण विकोपाला जाऊन त्याचे परिणाम काहीही होऊ शकतात अशाच प्रकारची एक घटना मुंबईत घडली. मुंबईच्या साकीनाका परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली. काजूपाडा येथे ताडी पिण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की एका मित्राने दुसऱ्याची हत्या केली. खुर्शीद उर्फ रिजवान शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेरअली अहमद शेख याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
Mumbai Curry Road Crime Family Dispute Brother Attack