मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात बेरोजगारी प्रचंड वाढल्याने तरुणाई भरकटली आहे. त्यामुळेच गुन्हेगारी वाढली असून विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरात गेल्या काही दिवसांमध्ये तरुण वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडल्याचे दिसून येतात. नाशिक शहरात गेल्या पंधरा दिवसात चार खुनाचे प्रकार घडले असून यामध्ये तरुण मुलांनीच तरुणांचे खून केले आहेत, तर दुसरीकडे पुण्यासारख्या शहरात गाड्या जळणे, तरुणींचे विनयभंग किंवा लैंगिक अत्याचार यासारखे प्रकारे वाढले आहेत. त्याच वेळी मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये देखील गुन्हेगारी वाढलेली दिसून येते. मुंबईत एका भरकटलेल्या तरुणांने देखील केवळ मैत्रिणी सोबत मौजमजा करण्यासाठी आणि तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी चक्क वेगवेगळ्या ठिकाणी स्कुटी गाड्यांची चोरी केली. विशेष म्हणजे तो वाहन दुरुस्तीचे काम करणारा मेकॅनिकल असल्याने त्याला गाडी विना चावी गाडी कशी सुरू करायची हे माहीत होते, परंतु अखेर पोलिसांनी सहा त्याच्या जवळील सहा स्कुटी जप्त करीत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पेट्रोल संपले की…
मालवणी येथील रहिवासी अनिल भीमराव निंबाळकर ( वय २३ ) हा तरूण काही मिनिटांत स्कूटी चोरून पळून जायचा. प्रेयसीला खूश करण्यासाठी आणि तिच्या बरोबर समुद्र किनाऱ्यावर , चौपाटीवर मॉलमध्ये मौजमजा करण्यासाठी अनिल वेगवेगळ्या रस्त्यावर उभ्या किंवा वाहनतळ, वॉचमन नसलेल्या अपार्टमेंटच्या पार्कींग मध्ये जाऊन रोज नवीन अॅक्टिव्हा गाडया चोरायचा. चोरी केलेली अॅक्टिव्हा घेऊन तो आपल्या मैत्रिणी सोबत मौज करत होता. विशेष म्हणजे त्या गाडीतील पेट्रोल संपाले की तो भुरटा चोर तिथेच ती गाडी सोडून दुसरी गाडी (स्कूटी ) चोरून पळून जात असे. त्याच्या प्रियसी तथा मैत्रिणीची देखील त्याला या कामात साथ होती.
या आधारे घेतला शोध
दुचाकी गाड्या चोरीला गेल्याने नागरिक त्रस्त झाले होते . तसेच बोरीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्कूटी चोरीच्या तक्रारी व घटना वाढत होत्या. त्यामुळे नागरिकांची पोलीसांकडे गुन्हेगार शोधण्याची मागणी केली, या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्कूटीचा तपास सुरू केला. गुप्त माहिती व सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी अनिल हा मालाड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बोरिवली पोलिसांचे पथक तयार करून आरोपीला मालाड येथून त्याला अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून ६ अॅक्टिव्हा जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी बोरिवली, दहिसर, चारकोप आणि कस्तुरबा येथे ६ गुन्हे शोधले आहेत. त्यामुळे आता मुंबईत चार चाकीच नव्हे तर दुचाकी गाड्या देखील सुरक्षित नाहीत, त्या केव्हाही चोरीला जाऊ शकतात, अशी भीती नागरिकांना वाटत आहे.
Mumbai Crime Youth Girl Friend Police Arrest Borivali