गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अश्लील चित्रीकरण करुन तरुणीचे धर्मांतर… जबरदस्तीने विवाह… मुंबईतील धक्कादायक प्रकार

by India Darpan
जुलै 18, 2023 | 12:58 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही महिन्यांमध्ये लव्ह जिहादचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यात अशा प्रकार घडला. यापूर्वी देखील मुंबई, पुणे येथेच नव्हे तर अन्य राज्यात देखील असे प्रकार घडलेले आहेत. आता मुंबई असा भयानक प्रकार घडला आहे. तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करत तिचे अश्‍लील छायाचित्रण करून त्याच्या आधारे तिचे धर्मांतर व जबरदस्तीने विवाह केल्याचा प्रकार मीरा रोड येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी नयानगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

आत्महत्येची धमकी देत
याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तीन वर्षांपूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली होती. आरोपीने पीडितेवर प्रेम असल्याचे बोलून दाखवले; मात्र पीडितेने त्याला नकार दिला. त्‍यामुळे आरोपीने आत्महत्या करण्याची धमकी दिल्यामुळे पीडितेने त्याला होकार दिला. एके दिवशी आरोपीने पीडितेला त्याच्या घरी बोलावून आरोपीने पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या वेळी आरोपीने पीडितेचे अश्‍लील चित्रीकरण केल्याचे तिला सांगितले. ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तो तिला मुंबईला घेऊन गेला व त्याठिकाणी तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला. त्यानंतर आरोपी पीडितेला घरी घेऊन गेला असता त्याचा आधीच एक विवाह झालेला होता. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगीदेखील असल्याचे पीडितेला समजले. या प्रकारामुळे त्या महिलेला चांगलाच धक्का बसला.

…आणि तिने संधी साधली
आईशी वाद झाल्याने आरोपीने भाड्याने स्वतंत्र घर घेतले व त्याठिकाणी दोघे राहू लागले. बाहेर जाताना तो घराला कुलूप लावून पीडितेला डांबून ठेवू लागला. अनेकवेळा त्याने तिला मारहाणदेखील केली. आरोपीची आईदेखील पीडितेला दुबईला जाण्यासाठी तगादा लावू लागली. ते दोघे परदेशात जातात ही संधी साधून अखेर एक दिवस पीडितेने घरातून पळ काढला व आपले घर गाठले. त्यानंतर पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीसह त्याचे कुटुंबीय व मित्र अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्वांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे उलट सुलट चर्चा सुरू असून चांगलीच खळबळ उडाली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीमा हैदर आणि सचिनला एटीएसने घेतले ताब्यात… मोठे खुलासे होण्याची चिन्हे…

Next Post

नागपुरात याठिकाणी होणार बर्ड पार्क… राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा पुढाकार

India Darpan

Next Post
1BQXV

नागपुरात याठिकाणी होणार बर्ड पार्क... राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा पुढाकार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011