मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडिया केवळ पोस्ट, रील अपलोड करण्याचे माध्यम राहिले नसून त्याद्वारे आर्थिक उत्पन्नदेखील कमविण्यात येत आहेत. लाखोंच्या संख्येतील फॉलोअर्स, यूट्युबवरील व्हिडिओंना मिळणाऱ्या लाइक्स यामुळे अनेक जण पैसे कमविताहेत. असाच एक सोशल मीडिया इनफ्ल्युएन्सरला पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, हा गर्लफ्रेंडचे शौक पूर्ण करण्यासाठी चोरी करायचा. इतकेच नव्हे तर चोरीच्या पैशातून मौजमजा करण्यासाठी गोवा येथे जायचा.
चांगली जीवनशैली आणि व्यसन पूर्ण करण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला साकीनाका पोलिसांनी अटक केलीय. सोशल मीडियावर या इन्फ्लुएन्सरला तब्बल १० लाख फॉलोअर्स आहेत. एका प्लंबरच्या घरी चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी या सोशल मीडियाला स्टारला ५ सप्टेंबर रोजी साकीनाका पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी यांच्याकडून ३.३ लाख रुपये जप्त केली आहेत.
अभिमन्यू गुप्ता ( वय ३१) असं अटक करण्यात आलेल्या इन्फ्लुएन्सरचं नाव आहे. अभिमन्यू गुप्ता हा रांची येथील रहिवाशी आहे. गुरुवारी रात्री अभिमन्यूने साकीनाका येथील एका वाटर प्युरिफ्यार वितरक मोहम्मद शेख यांच्या प्लॅटमध्ये चोरी केली होती. एका कामगाराच्या साक्षीनं अभिमन्यूला पोलिसांनी अटक केली. शेख यांच्या घरातून त्याने सोन्याची दागिने लंपास केली.
यापूर्वी भोगलाय सात वर्षे कारावास
चोरी केल्यानंतर अभिमन्यू विमानाने रांची येथे पळून गेला होता. चोरी झाली त्यादिवशी शेख यांच्या घरी कोणीच नव्हते. शेख जेव्हा घरी परत आले तेव्हा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान अभिमन्यूवर मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे अशा विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या चार वर्षात त्याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला जुगाराचं व्यसन आहे. साकीनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या केल्याप्रकरणी अभिमन्यूने सात वर्षाचा कारावास भोगलाय. परंतु, तुरुंगातून सुटल्यानंतर तो परत चोरी करायचा.
Mumbai Crime Theft Girl Friend Boy Friend Police Arrest