ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वास्तविक पाहता मुंबई हे धावपळीचे शहर असले तरी साधारणपणे सुरक्षित शहर मानले जाते. परंतु अलीकडच्या काळात या शहरात अनेक भयानक घटना घडू लागल्या आहेत. विशेषतः हाणामारी, खून, बलात्कार यासारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधेरी पश्चिम येथील सात बंगला परिसरात डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून ३० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
वर्सोवा सात बंगला बस आगाराजवळ एक तरूण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरूणाला तातडीने कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे नाव सूरज असून आहे. त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला असून आरोपींचा कसून शोध घेतला जातोय. अंधेरी पश्चिमेच्या सात बंगला येथील बस डेपोमध्ये हे थरारक हत्याकांड घडलं. हत्या करण्यात आलेला तरुण हा एक गिटारीस्ट होता. रस्त्यावर गिटार वाजवून नागरिकांकडून उदरनिर्वाह करत होता. या तरुणाच्या डोक्यावर चक्क पेव्हर ब्लॉकने वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बस डेपोच्या दिशेने धाव घेत मृतदेहाचा आढावा घेतला. यानंतर मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.
दरम्यान, मृतदेहाची ओळख पटवण्याचं कामही पोलिसांकडून केलं जात होतं. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. मुंबईच्या अंधेरी परिसरात झालेल्या या हत्याकांडाच्या घटनेनं मुंबईत हत्याकांडाचे सत्रच सुरु असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, आता वर्सोवा पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला असून पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. वर्सोवा पोलीस स्थानिकातील वरीष्ट पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Mumbai Crime Paver Block Youth Murder FIR Police