मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियाचा वापर वाढल्याने गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्हेगारी तथा सोशल क्राईम वाढले आहे. विशेषता अल्पवयीन मुली, तरूणी आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार वाढले आहे. मुंबईत असाच एक गैरप्रकार घडला आहे. या संदर्भात अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ तयार करून व्हॉट्सअपद्वारे प्रसारीत केल्याप्रकरणी १८ वर्षांच्या अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी रात्री अटक केली. व्हिडिओ कॉलद्वारे आरोपीने पीडित मुलीचे आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीनुसार आरोपी मुलावर विनयभंग, पोक्सो कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
व्हिडिओ कॉल आणि…
अलीकडच्या काळात मोबाईल कसा वापरावा याचे प्रबोधन होणे देखील गरजेचे आहे, असे म्हटले जाते. कारण तरुण मुले विशेषतः वयात येणारे युवक हे मोबाईलचा चांगला वापर करण्याऐवजी वाईट गोष्टीसाठी वापर करताना दिसून येतात. विशेषतः अल्पवयीन व तरुण मुला मुलींमध्ये ओळख झाल्यावर त्यांच्या मध्ये निखळ मैत्री राहत नाही. तरूण मुले समवयस्क मुलींचा गैरफायदा घेतात, एका १५ वर्षांच्या पिडीत मुलीची आणि आरोपी दोघांमध्ये आधीपासून ओळख होती. पीडित मुलीला आरोपीने व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी आरोपीने तिचे आक्षेपार्ह स्थितीत चित्रीकरण केले होते. ही गोष्ट तरुण मुलीला माहिती नव्हती.
…आणि तिला धक्काच बसला
या भामट्या मुलाने तिच्या ओळखीचा चांगलाच गैरफायदा घेतला. पीडित मुलीच्या परिचीत व्यक्तींकडून तिचे अश्लील चित्रीकरण व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारीत झाल्याची माहिती मिळाली. मुलीने चित्रीकरण पाहिले असता तिला धक्का बसला. काही महिन्यात आरोपी तरूणाला व्हिडिओ कॉल केल्याचे तिच्या लक्षात आले.त्यानंतर तिने याप्रकरणी अॅन्टॉपहिल पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग, पोक्सो व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले असताना त्याचा गुन्ह्यात सहभाग आढळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकारामुळे आपल्या मुली सुरक्षित नाहीत अशी भावना पालकांमध्ये व्यक्त होत आहे.
Mumbai Crime Minor Girl Indecent Video WhatsApp Youth Arrest