सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘पतीला तलाक दे’, असे म्हणत प्रियकराने केले हे धक्कादायक कृत्य…

by India Darpan
सप्टेंबर 8, 2023 | 2:00 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात कोण कशा पद्धतीने कोणाला ब्लॅकमेल करेल हे सांगता येत नाही, एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या लहान मुलीचे अपहरण केले. अपहरणाचे कारण म्हणजे पैसा किंवा संपत्ती नसून तिचा पती तिला तलाक किंवा घटस्फोट देत नव्हता, त्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी त्याने हा विचित्र तथा गैरप्रकार केल्याने मोठी खळबळ उडाली होती. आणखी वाईट गोष्ट म्हणजे अपहरण करून हा बदमाशी संप रेल्वेत त्या मुलीला घेऊन शौचालयात लपत होता, त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता, अखेर पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफिने अटक केली.

प्रेयसीच्या मुलीचे अपहरण
नागपाडा परिसरात एका प्रियकराने प्रेयसीच्या पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. प्रेयसीचा पती त्याला दाद देत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, मात्र मुलीचे अपहरण झाल्याने तिच्या आई-वडील चांगलेच घाबरून गेले. त्यांनी तातडीने पोलिसांना ही घटना कळविली. पोलिसांनी लगेच संशयित आरोपीचा पाठलाग सुरू केला. तो एका एक्सप्रेस रेल्वे मध्ये असल्याचे समजले, मात्र स्टेशन आले की तो रेल्वेच्या संडास मध्ये लपायचा. अखेर, शेगाव येथे शालिमार एक्स्प्रेस पोहचताच त्याला शौचालयातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. आता नागपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.

नाशिकमध्ये असल्याचे समजले
रोतीन घोष (३५) याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध होते. मात्र या प्रकाराला त्या महिलेचा पती विरोध करत होता त्यामुळे प्रियकराने त्याच्यामागे तलाक देण्याचा तगादा लावला, इतकेच नव्हे तर प्रियकर रोतीन घोष (३५) त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीला घेऊन पसार झाल्याचे समजताच, रात्री उशिराने त्यांनी तात्काळ नागपाडा पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. नागपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तांत्रिक तपासात आरोपी नाशिकमध्ये असल्याचे समजले.

थेट शौचालयातूनच धरले
तो लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शालिमार एक्स्प्रेसने गेल्याची माहिती हाती लागली. पथकाने हाच धागा पकडत, पाठलाग सुरू केला. आरोपी शौचालयात लपत असल्याच्या शक्यतेतून त्यांनी, गाडी शेगाव येथे पोहोचताच शौचालयात शोध घेतला. तेव्हा, लपून बसल्याचे दिसून आला. पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका करत, आरोपीला ताब्यात घेतले. मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. आपल्या मुलीला सुखरूप पाहून तिच्या आईचा जीव भांडयात पडला. आपल्या आईला बघताच ती आईच्या कुशीत शिरली.

Mumbai Crime Girl Friend Boy friend Arrest Police
Love Affair Talaq Girl Kidnap Railway

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणी चार्जशीट दाखल… बघा, काय म्हटलंय त्यात…

Next Post

निवडणूक शपथपत्र प्रकरण… देवेंद्र फडणवीसांविषयी कोर्टाने दिला हा निकाल…

Next Post
devendra fadanvis

निवडणूक शपथपत्र प्रकरण... देवेंद्र फडणवीसांविषयी कोर्टाने दिला हा निकाल...

ताज्या बातम्या

rain1

मान्सून सक्रिय…पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता

जून 9, 2025
Audi A4 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ही सिग्‍नेचर एडिशन’ लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी पावणे चार लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

जून 9, 2025
Raj Thackeray

मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले….

जून 9, 2025
crime1

मिळकत खरेदी विक्रीत शेजा-यालाच गंडा…तीन संशयिताविरोधात गुन्हा दाखल

जून 9, 2025
Nashik city bus 6 e1723473271994

ऑफलाईन पद्धतीने पास काढताय? तर मग जाणून घ्या ही नवीन प्रक्रिया….

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011