मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई शहरात गुन्हेगारांच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. खून, मारामारी यासारख्या घटनांमुळे पोलिसांचे काम वाढले आहे. पोलीस गुन्ह्याचा तपास करत असतानाच पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुंबईच्या उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसात खुनाचे प्रकार वाढलेले दिसून येतात. त्यातच चेंबूरजवळील वाशी नाका परिसरात १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाची कोयत्याने हत्या करून शरीराचे चार तुकडे केल्याचा प्रकार उघड झाला आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईत एका घटनेत अशाच प्रकारे महिलेचे तुकडे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवण्याचा भयानक प्रकार घडला होता. आता या प्रकरणातही आरोपीने मृतदेहाचे तुकडे घरातच लपून ठेवले होते.
संशयातून प्रकार
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ईश्वर मारवाडी ( वय १७ ) हा मुलगा लहान असतानाच त्याच्या आई वडील यांचे निधन झाले. त्यामुळे त्याचा सांभाळ गरीब एका कुटुंबाने केला. शफी शेख( वय ३३ ) हा या कुटुंबाचा जावई असून त्याची पत्नी ही त्यांची मुलगी आहे. साहजिकच शफी आणि ईश्वर यांची ओळख झाली होती आणि घरोब्याचे संबंध निर्माण झाले होते, ईश्वर हा शफीच्या पत्नीला बहीण मानत होता, मात्र शफीच्या मनात ईश्वर विषयी संशय निर्माण झाला. इतकेच नव्हे तर ईश्वरने आपल्या पत्नीचे छेड काढली, संशयाचे भूत शफीच्या मनात निर्माण झाले होते. त्यातूनच त्याने ईश्वरची कोयत्याने हत्या करून शरीराचे चार तुकडे केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
घरातच पिशवीमध्ये ठेवले मृतदेहाचे तुकडे
मुंबईच्या म्हाडा कॉलनी, वाशी नाका येथे आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भयानक प्रकार म्हणजे आरोपीने मुलाचे हत्या करत डोके, दोन हात वेगळे केले. तसेच आरोपीने ईश्वरचे चार तुकडे केले. हत्या केल्यानंतर स्वयंपाक घरातच त्याच्या मृतदेहाचे तुकडे पिशवीत लपवून ठेवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
क्रुर हत्या आणि खूनाचे प्रकार मुंबई, पुणे सारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. परंतु त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ते लपवून ठेवण्याचे आणखीनच विकृत सुरू आहेत.
Mumbai Crime Boy Brutal Murder Dead Body pieces Chembur