मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील बहुप्रतीक्षित कोस्टल रोड प्रकल्प येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय मुंबई महापालिकेने ठेवले असून कोस्टल रोडच्या कामापैकी आतापर्यंत एकूण ७७ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने तब्बल साडेबारा हजार कोटी रुपये खचून हा कोस्टल रोड तयार होणार आहे. हा प्रकल्प दक्षिण भाग आणि उत्तर भाग या दोन भागात विभागला गेला आहे यामध्ये दक्षिण भागाचे काम आधी हाती घेण्यात आले आहे. मरीन लाईन्सपासून प्रियदर्शिनी पार्कपर्यंत बोगदातून प्रवास केल्यानंतर पुढील कोस्टल रोड हा भराव टाकलेल्या जमिनीवर आहे. मुंबईतील दहिसर ते ठाणे जिल्ह्यातील भाईंदर हे अंतर आता अवघ्या १० मिनिटात गाठता येणार आहे. दहिसर – भाईंदर उन्नत जोडरस्ता प्रकल्पातील निविदा प्रक्रिया यशस्वी होवून एक महत्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
या कंपनीची सर्वाधिक बोली
विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी एल ऍण्ड टी कंपनीने सर्वात कमी किंमतीची बोली लावली आहे. मुंबई किनारी रस्त्याचा अंतिम टप्पा असलेला हा उन्नत मार्ग मु्ंबई महानगरपालिकेने ४ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबईकरांसाठी रस्ते वाहतुकीसाठी विनाअडथळा आणि सिग्नल विरहीत असा दहा मिनिटात अंतर गाठण्याचा उत्तम पर्याय या प्रकल्पाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. रस्ते वाहतुकीची पर्यायी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करणाऱ्या या प्रकल्पात एक पूल आणि दोन आंतरबदल मार्गिकांचा समावेश आहे. यामुळे दहिसर पश्चिम आणि भाईंदर पश्चिमेला कनेक्टिव्हिटी सहज शक्य होईल. या उन्नत मार्गाची एकूण लांबी- ५ किमी असून प्रकल्पासाठी अंदाजित कालावधी-३ वर्ष असा आहे. या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च- १ हजार ९६० कोटी रूपये इतका आहे.
सिग्नलही नसणार
खरे तर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान व्हावा तसेच मुंबई आणि भाईंदर ही दोन शहरे जोडण्यासाठी उन्नत मार्गाची आखणी करण्याचे निर्देश मु्ंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले होते. त्यानुसार आराखडा तयार करून दहिसर-भाईंदर उन्नत मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रकल्पाच्या निमित्ताने जलद वाहतुकीचा पर्याय दोन्ही शहरातील नागरिकांना मिळणार तर आहेच, समवेत सिग्नलचा अडथळा नसलेला मार्ग तसेच वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून या नवीन मार्गाचा वापर नागरिकांना करता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली आहे. प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर पुढील ३ वर्षांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही संबंधित कंपनीची असणार आहे.
या कंपनीला मिळाले काम
या पोस्टल रोड मुळे दहिसर आणि भाई सध्या दूरवर भासणारी उपनगरे आणखी जवळ येणार आहेत सध्या तरी पश्चिम उपनगरात दहिसर (पश्चिम) ते भाईंदर (पश्चिम) या भागात फक्त रेल्वे मार्गाद्वारे जोडणी उपलब्ध आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या निमित्ताने दहिसर ते भाईंदर दरम्यान आता रस्ते जोडणी उपलब्ध होणार आहे. मु्ंबई महापालिका या पूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. त्यासाठी एकूण ४५ मीटर रूंद आणि पाच किलोमीटर लांब अंतराच्या उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया मु्ंबई महापालिकेने ऑक्टोबर २०२२मध्ये सुरू केली होती. या निविदा प्रक्रियेतील आर्थिक निविदेचा टप्पा यशस्वीपणे आज पार पडला. महापालिकेने या प्रकल्पासाठी अंदाजित खर्चासाठी निविदा प्रक्रिया राबवली. आता या प्रकल्पाचे काम लार्सन एण्ड टुब्रो कंपनीला देण्यात येणार आहे.
३३० खांबांचा पूल
सदर प्रकल्प अंतर्गत मुंबई महानगरपालिका हद्दीत १.५ किमीचा उन्नत मार्ग आणि मिरा भाईंदर महापालिका हद्दीत ३.५ किमी उन्नत मार्गाचा समावेश असेल. या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून करण्यात येईल. तर मिरा भाईंदर हद्दीतील प्रकल्पासाठीच्या खर्चाचा परतावा हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबईई महापालिकेला देण्यात येणार आहे. दहिसर खाडी भागात या प्रकल्पाच्या निमित्ताने स्टीलचा सुमारे १०० मीटर अंतराचा पूल तयार करण्यात येईल. एकूण ५ किमी उन्नत मार्गांसाठी एकूण ३३० खाबांचा आधार असणार आहे. प्रत्येक ३० मीटर अंतरावर हे खांब असतील. संपूर्ण रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा तयार करण्यात येणार आहे. दहिसर भाईंदर जोड रस्त्याचा वापर प्रति दिन एकूण ७५ हजार वाहने करतील, असा अंदाज आहे. एकंदरीत या कोस्टल रोड मुळे मुंबई शहरातील उपनगरे रहदारीच्या व वाहतुकीच्या दृष्टीने आणखी जवळ येणार आहेत.
Mumbai Coastal Road Project Traffic Dahisar Bhayandar