उद्यापासून मुंबईत पुढील ५ दिवस गरमीमुळे घामटा
उद्या बुधवार दि.१० मे पासुन ढगाळ वातावरण व दिवसाच्या कमाल तापमान साधारण २ ते ३ डिग्री वाढीमुळे आर्द्रतायुक्त व गरम अश्या हवेमुळे वातावरणातुन पुढील ५ दिवस म्हणजे रविवार १४ मे पर्यन्त मुंबईसह संपूर्ण कोकणात अस्वस्थता जाणवेल. उर्वरित महाराष्ट्रात सध्या सरासरी इतके किंवा त्याखाली जाणवत असलेले दिवसाचे कमाल तापमान पुढील ५ दिवस तसेच राहण्याची शक्यता जाणवते.
तसेच आज व उद्या मुंबईसह रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर ह्या जिल्ह्यातच ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते.
बद्री-केदार पर्यटकासाठी बुधवार दि. १० मे १२ मे अश्या ३ दिवसाच्या स्वच्छ वातावरणा नंतर येऊ घातलेल्या नवीन पश्चिमी झंजावातमुळे १३ ते १७ मे असे ५ दिवस तेथील वातावरण काहीसे ढगाळलेले राहून किरकोळ पावसाची शक्यताही जाणवते.
बंगालच्या उपसागरात आज मंगळवार दि.९ मे संध्याकाळपर्यन्त तीव्र कमी दाबात विकसित होण्याची शक्यता असलेले क्षेत्राचे उद्या १० मे ला ‘ मोचा ‘ चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता जाणवते. महाराष्ट्राच्या वातावरणावर त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही.
Rain/thundershowers very likely at isolated places over parts of South Madhya Maharshtra & South Konkan during next 2 days . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट द्यI pic.twitter.com/f312XMc895
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 9, 2023
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Mumbai Climate Weather Forecast Summer