माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवार (दि.१७) पासुन मंगळवार (दि.२१) पर्यन्त पहाटेच्या किमान तापमानबरोबरच दुपारच्या कमाल तापमानातही सरासरी पेक्षा अधिक वाढ होवून कमी होणाऱ्या रात्रीच्या थंडी बरोबरच दिवसाही ऊबदार वातावरणाबरोबरच दुपारी उन्हाचा चटका चांगलाच जाणवेल, असे वाटते.
विशेषतः मुंबईसह संपूर्ण कोकणात व संपूर्ण गुजराथ राज्यात कमाल तापमानात अधिकच वाढ होवून येत्या ह्या ४ दिवसात तेथे असह्य उन्हाच्या झळा अधिकच जाणवतील. असे वाटते. बुधवार दि.२२ पासुन मात्र पुन्हा दुपारचे कमाल तापमान काहीसे खालावून सुसह्यता जाणवेल, त्याचबरोबर हवेतही काहीसा थंडावा जाणवेल.
शेतकऱ्यांनी येत्या ५ दिवसात पाण-ताणावर असलेली कांदा व भाजीपाला सारख्या पिकांना मात्र नक्कीच दिवसा पाणी न भरता मध्य व उत्तर रात्री नंतर पिकांचे सिंचनाचे नियोजन करणे सध्या तरी गरजेचे आहे, असे वाटते.
काढणीस आलेल्या द्राक्षेबागेत येत्या ५ दिवसात फळात वेगात शर्करा-स्थिरवणीची शक्यता असुन शेतकऱ्यांनी त्यानुसार फळकाढणी, विक्री वेळापत्रकाचे नियोजन करावे, असे वाटते.
अजूनही थंडी गेलेली नाही. कमी तीव्रतेचे का होईना थंडीचे आवर्तने ही येऊ शकतातच. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात पाऊस अथवा गारपीटीचा कोणतीही शक्यता नाही. ह्याची कल्पनाही शेतकऱ्यांच्या मनी असावी, असे वाटते.
विशेष इतकेच!
Mumbai Climate Forecast Weather