मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुन्हेगारीकडे वळलेल्या अल्पवयीन मुलांमध्ये सुधारणा करून त्यांना चांगल्या वळणावर आणण्यासाठी सरकारने बालसुधारगृह निर्माण केले. राज्यात सर्वच शहरांमध्ये ही सोय आहे. मात्र मुंबईतील डोंगरी भागात सुधारगृहातच ड्रग्सची देवाणघेवाण होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
मुंबईतील डोंगरी या भागाचे नाव ऐकल्यावर एकच नाव डोळ्यापुढे येतं ते म्हणजे दाऊद इब्राहीमचे. म्हणजेच अंडरवर्ल्ड डॉनचे. दाऊदचे बालपण याच भागात गेले. गुन्ह्यांचे प्रमाणही या भागात खूप जास्त आहे. अश्यात बालसुधारगृहाच्या माध्यमातून एक आशेचा किरण मिळण्याची शक्यता होती. मात्र इथल्या घटनेने पोलिसांना आणि व्यवस्थेला अधिकच टेंशन दिले आहे. या सुधारगृहात भिंतीच्या पलीकडून दररोज ड्रग्स पोहोचत होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
साहील बाबू पाटोळे आणि शरीफ अकबर शेख (दोघांचेही वय १८) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई आकाश शिंदे डोंगरी बाल निरीक्षण गृहात कर्तव्यावर होते. निरीक्षण गृहाचे अधिक्षक कंठीकर यांच्या सूचनेनुसार बालकांची झाडाझडती सुरू केली. त्यावेळी दोन आरोपी चौकशीला विरोध केला. त्यावरून त्यांना संशय आला. त्यामुळे सर्वांत आधी दोघांची झडती घेण्यात आली. त्यात त्यांच्या खिशांमध्ये प्लास्टिकच्या पुडीत गांजा सापडला. यासोबत मोबाईल आणि ब्लेडचा तुकडाही होता. दोघांनाही पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.
१५ ग्रॅम गांजा आणि…
झडती घेतल्यानंतर १५ ग्रॅम गांजा, गांजा ओढण्याची चिनीमातीची चिलीम, पांढऱ्या रंगाचे कापड, मोबाईल आणि ब्लेड या गोष्टी सापडल्या. मोबाईलवरून ड्रग्स मागवत असल्याचे कळल्यामुळे पोलिसांना संशय आला होता. कारवाईनंतर तिघांनी पोलीस व अधिक्षकाला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.
Mumbai Childrens Home Drugs Racket