मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोअर परळ येथील कमला मिल्सच्या ट्रेड वर्ल्ड टॉवर सी येथे आज सकाळी एक दुर्घटना घडली आहे. इमारतीतील प्रवासी लिफ्ट चौथ्या मजल्यावरून अचानक तळमजल्यावर कोसळली. या दुर्दैवी घटनेत १४ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सुरक्षा कर्मचार्यांनी वाचवले, त्यापैकी ८ जखमींना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, एकाला केईएम हॉस्पिटलमध्ये आणि अन्य ४ जखमींना किरकोळ जखमींनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिला आहे.
लोअर परळ मध्ये सेनापती बापट मार्ग, कमला मिल येथील ट्रेड वर्ल्ड टॉवर येथे ही दुर्घटना घडली. सोळा मजल्याही ही इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट अचानक खाली कोसळली. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या ग्लोबल आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असून कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती आहे.
प्रियांका चव्हाण, प्रतीक शिंदे, अमित शिंदे, मोहम्मद रशीद, प्रियांका पाटील, सुधीर सहारे, मयूर गोरे, तृप्ती कुबल यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे वय २० ते ४६ वर्षे या दरम्यान आहे. दरम्यान, ही लिफ्ट अचानक का कोसळली हे अद्याप कळालेले नाही. मात्र, या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.