मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून किंवा राज्यातच नव्हे तर देशभरातील अनेक भागांमध्ये करोनाने पुन्हा एकदा पसरवण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः राज्यात सातारा, सांगली नंतर आता मुंबईत कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मनपाच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आला आहे, इतकेच नव्हे तर महापालिकासह अनेक शासकीय कार्यालयांमध्ये मास्क घालणे बंधनकारक करण्यात येत आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. याबाबत केंद्रिय आरोग्यमंत्रालयाने नियमावली जारी केल्यानंतर आता मुंबई महापालिकेतील सर्व रुग्णालयांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई मनपातील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याशिवाय, ६५ वर्षांवरील अधिक वयाच्या व्यक्तींना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील नागरिकांना मास्कपासून सुटका मिळालेली असतानाच आता मास्क पुन्हा परतला आहे. त्यामुळे आता वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील काही दिवसांत मुंबईसह इतर शहरांमध्येही मास्कसक्ती करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबईत कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सर्व विभागांची एक बैठक आयोजित केली होती. त्यात मनपाच्या रुग्णालयांमध्ये मास्कची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरात सारख्या इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभरात मॉकड्रील केले जात आहे. यात शासकीय व खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींच्या तयारीची चाचणी होणार आहे.
https://twitter.com/mybmc/status/1645420154774487040?s=20
Mumbai BMC Corona Mask Compulsory