मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मांसाहारी जेवणाच्या अनेक हॉटेल मुंबई शहरात आहेत, त्या ठिकाणी नेहमीच गर्दी असते, अशाच एका मांसाहारी जेवणाच्या हॉटेल मध्ये चक्क उंदराच्या मांसाचे तुकडे आढळले. वांद्रे येथील एका प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये चिकन आणि मटणाच्या डिशमध्ये उंदराचे मांस आढळल्याची घटना घडली. त्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
चिकनच्या डिशमध्ये
अनुराग सिंग (वय ४०) हे त्यांचा मित्र अमितसोबत बांद्रा पश्चिम येथील पाली नाका येथील ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी रोटीसोबत चिकन आणि मटणाची थाळी ऑर्डर केली. जेवताना त्यांना त्यामध्ये एक मांसाचा तुकडा समोर आला, इतर तुकडयापेक्षा तो तुकडा वेगळा दिसत होता. जेवणाचा काही भाग खाल्ल्यानंतर अनुराग सिंग त्यांचा मित्र अमित यांना चिकनच्या डिशमध्ये काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यांनी
जवळून तपासणी केल्यावर तो उंदराच्या मांसाचा तुकडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर अनुराग सिंग यांनी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ढाब्याचा मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट शिक्वेरा (वय ४० वर्षे) आणि सदर हॉटेलचे आचारी तसेच चिकनचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
अखेर गुन्हा दाखल
खरे म्हणजे कोणीही घराबाहेर म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन जेवण करताना ऑर्डर प्रमाणे मिळावे, अशी अपेक्षा असते. परंतु काहीतरी वेगळेच समोर आले किंवा जेवणात झुरळ किंवा पालीचे तुकडे आढळण्याचे प्रकार घडलेले आहेत, हा आणखी त्यापेक्षा खूपच वेगळाच होता. कारण प्लेटमध्ये निरखून पाहिले असता ताटात जरा वेगळा मांसाचा तुकडा दिसला. त्यानंतर जवळून तो तुकडा बघितला असता, ते मांस उंदराचे असल्याचे लक्षात आले, हे पाहून अनुराग सिंग आणि अमित यांना चांगलाच धक्काच बसला. हॉटेलमधील इतरांना हा प्रकार कळल्यावर त्यांनीही संताप व्यक्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
Mumbai Bandra Restaurant Chiken Rat Meat Case Filed