बदलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. एका बालिकेवर नियमितने लसीकरण करण्यात येत होते. परंतु एका खासगी रुग्णालयात तिला इंजेक्शन दिल्यानंतर तिच्या मांडीच सुई पाच महिने राहिली, एक्स-रे मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या मुलीवर आता शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती सुई काढण्यात आली आहे. याप्रकरणी बालिकेच्या आईने संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
म्हणून उघड झाला हा प्रकार
या संदर्भात मिळालेली धक्कादायक माहिती अशी की, अंबरनाथमध्ये राहणारे विशाल बनसोडे यांनी मुलगी अद्विका हिचे ९ व्या महिन्यातील लसीकरण करण्यासाठी मुलीच्या आईने तिला बदलापूरच्या दुबे रुग्णालयात नेले होते, तेथे लसीकरण झाल्यानंतर काही दिवस तिच्या मांडीवर सूज आली होती. मात्र काही काळाने सूज उतरल्यानंतर पुढील ५ महिने अद्विकाला कोणताही त्रास झाला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी ती सतत मांडीला हात लावून तेथील त्वचा खाजवत होती. मात्र तिला काय त्रास होतो हे कोणालाच कळत नव्हते. बनसोडे दाम्पत्यांने आपल्या मुलीला त्रास होत असल्याने तिला अंबरनाथच्या एका दुसऱ्या रुग्णालयात नेले. यावेळी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तिच्या मांडीचा एक्सरे केल्यानंतर मांडीत इंजेक्शनची सुई असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार माहीत होताच त्यापालिकेच्या आई वडील तर चांगलेच घाबरून गेले होते.
मांडीला तीन टाके
नऊ महिन्याची अद्विका हिच्या मांडीला सारखी खाज सुटत असल्याने अखेर ऑपरेशन करून मांडीतील सुई काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ऑपरेशन केल्यानंतर अद्विकाच्या मांडीवर तीन टाके पडले आहेत. त्यापुर्वी तब्बल ५ महिने इंजेक्शनची सुई अद्विकाच्या मांडीत होती. आता ऑपरेशन झाल्यानंतर तिला कोणताही धोका नसला तरी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन दुबे रुग्णालयातील संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बनसोडे दाम्पत्यांनी केली आहे. तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच यामध्ये कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असे दुबे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी सांगितले आहे. मात्र या कर्मचाऱ्यावर खरेच कारवाई होणार का? याकडे रुग्णांच्या नातेवाईकांचे लक्ष लागले आहे.
Mumbai Badlapur Vaccination Child Injection Needle
Health Hospital