मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई विमानतळाची मालकी अदाणी समूहाला देण्यासाठी मोदी सरकारने जीवीके कंपनीवर दबाव आणला, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना केला होता. जीव्हीके कंपनीने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यावेळी आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, असे स्पष्टीकरणही कंपनीचे उपाध्यक्ष संजीव रेड्डी यांनी हे आरोप फेटाळून लावले.
संजीव रेड्डी यांचे नेमके म्हणणे काय?
अदाणी समूहासोबत झालेली हस्तांतरणाची प्रक्रिया, त्यावेळचा कालखंड, कंपनीची स्थिती आदी माहिती रेड्डी यांनी मांडळी. ते म्हमाले की, हस्तांतरणाची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे. हे हस्तांतरण होण्यापूर्वी आम्ही बंगळुरू विमानतळाचे अधिग्रहण केले होते. त्यामुळे आमच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. त्यानंतर करोनाचे संकट आले आणि तीन महिने मुंबई विमानतळ बंद होते. उत्पन्न ठप्प झाले होते. आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आमच्यावर कर्जही होते. कठीण स्थितीतून मार्ग काढण्यासाठी अदाणी समूहासोबत करार केला. पण, त्यासाठी कोणताही दबाव मात्र आमच्यावर नव्हता. कंपनीचे हित लक्षात घेऊनच निर्णय घेतला गेल्याचे संजीव रेड्डी म्हणाले.
राहुल गांधी यांचे आरोप काय?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी नियम बदलवून कोणताही अनुभव नसणाऱ्या अदाणी समूहाला देशातील सहा विमानतळांची मालकी दिली. मोदी सरकारने नियम बदलल्यानंतर भारतातील सर्वात महत्त्वाचे असलेले मुंबई विमानतळ जीव्हीके कंपनीकडून घेऊन अडाणींना दिले. यासाठी मोदी सरकारने ईडी, सीबीआय सारख्या तपास संस्थांचा वापर करत जीव्हीके कंपनीवर दबाव आणला, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांचे भाजप नेत्यांकडून खंडण केले जात आहे. उलट गांधींवरच टीकेची झोळ उठविण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. पण, या सर्वात रेड्डी यांचे स्पष्टीकरण महत्त्वपूर्ण आहे.
Mumbai Airport GVK Company on Rahul Gandhi Allegation