मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) मोठे यश मिळाले आहे. डीआरआयने मुंबईत ३.३५ किलो सोने जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे 2.1 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे डीआरआयने ही कारवाई केली आहे.
काय प्रकरण आहे?
गुप्तचर माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शोध घेतला. यावेळी त्यांनी एक प्रवासी, ड्युटी फ्री शॉपचे काही कर्मचारी आणि फूड कोर्टचे काही कर्मचारी पकडले. त्याच्याकडूनच ही वसुली करण्यात आली.
असे आहे रॅकेट
डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार हे सोने पेस्टच्या स्वरूपात जप्त करण्यात आले आहे. त्याचे वजन सुमारे 3.35 किलो आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे २.१ कोटी रुपये आहे. विमानतळाचे कर्मचारी हे तस्करीचे सोने विमानतळाबाहेर नेऊन विविध ठिकाणी पुढील व्यक्तीकडे सुपूर्द करायचे.
Mumbai Airport Gold Smuggling Racket Burst