मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई विमानतळावर आलेल्या एका दिव्यांग मुलाच्या फोनमुळे सारे प्रशासन हादरले आणि कामाला लागले. खरे तर हा फोन दिव्यांग मुलाचा आहे, हे कुणालाच माहिती नव्हते. कारण फोनवर जी धमकी देण्यात आली तशी धमकी दहशतवाद्यांकडूनच येत असते. पण सत्य पुढे आले तेव्हा साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक फोन खणखणतो. कर्मचाऱ्याने फोन उचलला तर थेट धमकीच ऐकायला आली. ‘दहा तासांनंतर एक विमान मुंबई विमानतळावरून टेक-ऑफ करणार आहे. या विमानात बॉम्ब ठेवलेला आहे’, अशी धमकी फोनवर आली. त्यानंतर सगळे प्रशासन कामाला लागले. सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. त्याचवेळी फोन कुणी केला याचा तपास सुरू झाला. काही वेळाने सत्य पुढे आले आणि साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सत्य पुढे आले तेव्हा बॉम्बची धमकी खोटी असल्याचे कळले त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला. पण दुसरे सत्य पुढे आले तेव्हा मात्र आश्चर्य वाटले. कारण हा फोन सातारा जिल्ह्यातील देऊळ गावातून आला होता आणि तोही एका दिव्यांग मुलाने केला होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली. सातत्याने गुन्हेगारी विश्वाशी निगडीत मालिका बघण्यामुळे एका दिव्यांग मुलाच्या हातून हा प्रकार घडल्याचे पुढे आले.
वडिलांचा फोन मुलाच्या हाती
दिव्यांग मुलाच्या हाती वडिलांचा फोन होता. फोनवर खेळत असताना त्याने ११२ क्रमांक डायल केला आणि त्यावर गंमत म्हणून धमकी दिली. त्यावेळी वडील त्यांच्या किराण्याच्या दुकानात बसले होते. त्यामुळे त्यांना याची काही कल्पनाच नव्हती. थेट पोलीस घरी आल्यावरच त्यांना घडलेला प्रकार कळला.
Mumbai Airport Disable Child Call Threat Bomb
Police FIR Satara