मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-आग्रा महामार्गावर उमराणे गावाजवळ आज एक भीषण प्रकार घडला. उड्डाणपूल उतरून एक ट्रक खाली येत होता. मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक दुभाजक तोडून थेट नाशिकच्या दिशेने असलेल्या रस्त्यावर आला.
या ठिकाणी बस थांब्यावर काही जण बसची वाट पहात उभे होते. त्याचवेळी ट्रक थेट त्यांच्या अंगावर गेला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत सर्व जण तेथून पळाले. त्यामुळे या अपघातात सुदैवाने कुठलीही अनुचित घटना घडली नाही. या अपघाताचा थरार मात्र समोरील हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून त्याची चर्चा होत आहे.
बघा, हा थरारक व्हिडिओ