मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील चेंबूर परिसरात पहाटे लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. येथील सिध्दार्थ कॅालनीतील दुमजली घराला ही आग लागली. ही आग विझवण्यात यश आले असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग दुर्घटनची उच्चस्तरीय चौकशी होईल असे सांगितले. त्याचप्रमाणे मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आगीमध्ये पॅरिस गुप्ता (७), मंजू प्रेम गुप्ता (३०), प्रेम गुप्ता (३०), नरेंद्र गुप्ता (१०), विधी गुप्ता (१५), गितादेवी गुप्ता (६०), अशी मृत व्यक्तींची नावे आहे. ही आग शॅाक सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
सिध्दीर्थ कॅालनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजील घराला ही आग पहाटे ५.१५ वाजता लागली. या घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते. या दुकानाला इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामानाला सुरुवातील आग लागली. त्यांतर ही आग पसरल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.